विशाखापट्टणम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाखो जणांसोबत विशाखापट्टणम इथं योग दिवस 2025 साजरा केला. यावेळी त्यांनी, "योग हा सर्वांसाठी आहे, सीमा, वय किवा क्षमतेपलीकडं योग आहे. योगामुळे जीवनाला दिशा मिळते, योगानं जगाला जोडून ठेवलं," असं स्पष्ट केलं. यावेळी त्यांच्यासोबत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आदी मान्यवर उपस्थित होते.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विशाखापट्टणम इथं जागतिक योग दिवस 2025 साजरा करण्यात येत आहे. या योग दिनाच्या उत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि मान्यवर देखील योग दिन साजरा करत आहेत. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हा योग दिन मानवतेची सुरुवात ठरो, त्यामुळे आंतरिक शांती हिच जागतिक धोरण बनते. योग हा जीवनाला दिशा देतो. योगानंच जगाला जोडून ठेवलं आहे. सीमा, वय आणि क्षमतेपलिकडे योग हा सर्वांसाठी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :