ETV Bharat / bharat

मधुचंद्राला गेल्यानंतर बेपत्ता झालेली सोनम सापडली; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नाट्यमय वळण - RAJA RAGHUVANSHI MURDER CASE

पतीसोबत शिलाँगमध्ये मधुचंद्रासाठी गेल्यानंतर बेपत्ता झालेली सोनम रघुवंशी सापडली आहे. पण, राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणाला नाट्यमय वळण लागलं आहे.

Indore honeymoon couple missing news
पती समवेत सोनम रघुवंशी (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 9, 2025 at 8:26 AM IST

Updated : June 9, 2025 at 9:49 AM IST

2 Min Read

इंदौर (भोपाळ) : मधुचंद्रासाठी शिलाँगला गेलेल्या राजा रघुवंशी यांची पत्नी सोनम ही (Raja raghuvanshi murder case) पोलिसांनी सापडली आहे. सोनम ही उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये आढळली. सोनम गाझीपूरच्या नंदगंज पोलीस स्टेशन परिसरातील एका ढाब्यावर आढळली. मात्र, राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मधुचंद्रासाठी गेलेल्या सोनम रघुवंशीनंच पती राजाची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड कोंगकल संगमा यांनी याबाबत एक्स मीडियात पोस्ट केली आहे. कॉनराड कोंगकल संगमा यांनी त्यांच्या 'एक्स' हँडलवर म्हटलं, "7 दिवसांत मेघालय पोलिसांना राजा हत्या प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी मध्य प्रदेशातून 3 हल्लेखोरांना अटक केली आहे. ''

ढाबामालक माहिती देताना (Source- ETV Bharat Reporter)

25 मे नंतर जोडप्याचा कुटुंबाशी तुटला होता संपर्क- इंदौर येथील वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी यांचे 11 मे रोजी इंदौर येथील सोनमशी लग्न झाले होते. लग्नानंतर 20 मे रोजी हे जोडपे हनिमूनसाठी शिलाँगला रवाना झाले. शिलाँगला पोहोचल्यानंतर त्यांचा 25 मेपर्यंत कुटुंबाशी संपर्क होता. मात्र, अचानक दोघांचेही फोन बंद झाल्यानंतर त्यांचे कुटुंब चिंतेत होते. बेपत्ता झाल्यानंतर सुमारे 10 दिवसांनी राजाचा मृतदेह सापडल्यानंतर सोनमचा शोध सुरू होता. राजा यांच्या कुटुंबानं मेघालय सरकारवर आरोप करत पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप केला. तसेच सीबीआय चौकशीची त्यांनी मागणी केली होती.

  • मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग यांनी राजा रघुवंशी हत्येबाबत निवेदन दिलं आहे. त्यांनी सांगितलं, मध्य प्रदेशातील इंदौर येथील एका पुरूषाच्या हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. सोनमच्या शरीरावर कुठेही जखम- दुखापत झालेली नाही. ती पूर्णपणे ठीक आहे.
Indore honeymoon couple missing
ढाब्यावर अशा अवस्थेत आढळली सोनम (Source- ETV Bharat Reporter)

गाईडच्या माहितीनंतर पोलिसांना मिळाले महत्त्वाचे धागेदोरे- हनिमूनसाठी इंदौर येथून आलेल्या जोडप्यासोबत इतर तीन पुरूष पाहिल्याचं मावलाखियात येथील गाईडनं पोलिसांना शनिवारी सांगितलं होतं. 23 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास जोडपे हे काही पुरुष पर्यटकांसोबत दिसले होते. ते लोक हिंदीत बोलत होते. त्यामुळे गाईडला त्यांचा संवाद कळू शकला नव्हता.

  • ढाबा मालक साहिल यादवच्या माहितीनुसार तिनं घरी फोन करण्यासाठी मोबाईल मागितला. ती फोनवर खूप रडत होती. त्यानंतर पोलिसांना कळवलं. पोलीस तिला ठाण्यात घेऊन गेले.
  • सोनमनं सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तिनं पतीची हत्या का केली? तिनं हत्येची योजना कशी आखली? हत्येत सहभागी असलेले लोक कोण आहेत? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा-

  1. ब्रिजखाली झोपलेल्या व्यक्तीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नवी मुंबईत घडली धक्कादायक घटना
  2. दीडशे रुपये चोरणाऱ्यांना विरोध करताना झटापटीत एकाचा मृत्यू, दोन आरोपींना अटक

Last Updated : June 9, 2025 at 9:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.