नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सोमवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीबाबत सायंकाळी 5 वाजता चर्चा झाली. दोन्ही देशांच्या डीजीएमओ (DGMOs) मध्ये फोनवरुन संभाषण झालं. त्यानुसार, पुन्हा एकदा शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचे भारतीय सैन्य दलाकडून सांगण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन शस्त्रसंधी जाहीर केल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच सीमारेषेवर गोळीबार सुरू झाला होता. त्यावरुन,पु्न्हा एकदा दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
No enemy drones are being reported at present. The situation is calm and under full control: Indian Army pic.twitter.com/kutpFyVnRO
— ANI (@ANI) May 12, 2025
सीमेवर एकही गोळी सुटणार नाही : भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा शस्त्रसंधीबाबत सायंकाळी 5 वाजता चर्चा झाली. दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये संभाषण झालं. त्यानुसार, पुन्हा एकदा शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचे भारतीय सैन्य दलाकडून सांगण्यात आलं आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चर्चेनुसार दोन्ही देशांच्या सीमारेषेवर एकाही बंदुकीतून गोळी सुटणार नाही. सीमारेषेवर आणि पुढील भागातून तत्काळ दोन्ही देशांनी आपलं सैन्य कमी करण्यासंदर्भातही या संभाषणात चर्चा झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दिसले संशयित ड्रोन : जम्मू-काश्मीरसध्या भारत पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात तणाव पाहायला मिळत आहे. त्यातच आता जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात संशयित ड्रोन पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून भारतीय सुरक्षा दलांनी तत्काळ या ड्रोनवर कारवाई केली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Talks between DGMOs (of India and Pakistan) were held at 5:00 PM, 12 May 2025. Issues related to continuing the commitment that both sides must not fire a single shot or initiate any aggressive and inimical action against each other were discussed. It was also agreed that both… pic.twitter.com/o2Oajr9v14
— ANI (@ANI) May 12, 2025
पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा : आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी कायम असणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावत जगाला संदेश दिला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' संपलं नसून त्यास स्थगिती देण्यात आल्याचे मोदींनी म्हटलं आहे. तसंच केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर याच विषयावर पाकिस्तानसोबत चर्चा होणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही वाचा -