नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लवकरच मोठी भर पडणार आहे. केंद्र सरकारनं भारतीय नौदलासाठी २६ राफेल सागरी लढाऊ विमानं (Rafale Marine Fighter jets) खरेदी करण्यासाठी ६३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कराराला मंजुरी दिलीय. यामुळं भारतीय नौदलाला मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानांचा ताफा मिळणार आहे.
२०३१ नंतर नौदलात सामील होण्याची शक्यता : मीडिया रिपोर्ट्सनुसार, या करारात ऑफसेट जबाबदाऱ्यांअंतर्गत फ्लीट मेंटेनन्स, लॉजिस्टिक्स सपोर्ट, कर्मचारी प्रशिक्षण आणि स्पेअर पार्ट्सचे स्वदेशी उत्पादन यासाठी एक मोठे पॅकेज देखील समाविष्ट असणार आहे. या महिन्याच्या अखेरीस फ्रान्सचे संरक्षण मंत्री सेबॅस्टियन लेकोर्नू भारत दौऱ्यावर येतील, तेव्हा या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पाच वर्षांनी हे विमानं मिळण्याची अपेक्षा आहे. राफेल एम विमानांचा हा ताफा २०३१ नंतर नौदलात सामील होऊ शकतो.
India clears mega deal to buy 26 Rafale Marine fighter aircraft from France. The government-to-government deal worth over Rs 63,000 crore will be signed soon. Indian Navy will get 22 single-seater and four twin-seater aircraft as part of the deal: Government Sources pic.twitter.com/g3Ef3snrbn
— ANI (@ANI) April 9, 2025
प्रगत नौदल लढाऊ विमानांपैकी एक राफेल एम : दरम्यान, ही विमानं भारतीय नौदलासाठी गेम-चेंजर ठरणार आहेत. कारण राफेल एम हे जगातील सर्वात प्रगत नौदल लढाऊ विमानांपैकी एक मानलं जातं. हे सफ्रान ग्रुपच्या (Safran Groups) अधिक मजबूत अशा लँडिंग गियरनं सुसज्ज आहे. ज्यामुळं युद्धनौकांमधून विमान उड्डाण करण्यासाठी सर्वोत्तम म्हटलं जातं आणि त्यात फोल्डिंग विंग्स आणि कठीण परिस्थितीत डेक लँडिंग आणि टेलहूकचा सामना करण्यासाठी मजबूत अंडरकॅरेज देखील आहे.
समुद्रात शत्रूविरोधी मोहिमांमध्ये विमानं निर्णायक भूमिका बजावतील : रिपोर्टनुसार, या करारांतर्गत भारतीय नौदलाला २२ सिंगल-सीटर आणि ४ ट्विन-सीटर असे एकूण २६ अत्याधुनिक राफेल सागरी लढाऊ विमानं मिळणार आहेत. ही जेट्स डसॉल्ट एव्हिएशन या फ्रान्सच्या नामांकित कंपनीकडून तयार करण्यात येणार आहेत. तसंच, ही विमानं प्रामुख्यानं स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवर तैनात केली जातील. कारण, हिंद महासागर क्षेत्रातील चिनी हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज लक्षात घेता भारताला आपली सामरिक क्षमता अधिक मजबूत करायची आहे. त्यामुळं समुद्रात शत्रूविरोधी मोहिमांमध्ये ही विमानं निर्णायक भूमिका बजावतील.
हेही वाचा :