ETV Bharat / bharat

१४ वर्षांची प्रतिज्ञा फळाला : हरियाणाच्या रामपाल कश्यप यांना पंतप्रधान मोदींनी स्वतः घातले बूट - PM MODI GAVE NEW SHOES TO RAMPAL

यमुनानगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कैथलच्या रामपाल कश्यप यांना नवीन बूट स्वतःच्या हातानी घातले. कारण काय ते ही बातमी वाचून तुम्हाला कळेल...

रामपाल कश्यप यांना पंतप्रधान मोदींनी स्वतः बूट घालताना
रामपाल कश्यप यांना पंतप्रधान मोदींनी स्वतः बूट घालताना (PM Modi@X)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 14, 2025 at 10:24 PM IST

1 Min Read

यमुनानगर (हरियाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणातील हिसार आणि यमुनानगरच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी हिसार विमानतळाचे उद्घाटन केले आणि यमुनानगरच्या औष्णिक विजेच्या तिसऱ्या युनिटची पायाभरणी केली. हिसारमधील महाराजा अग्रसेन विमानतळावरून पहिले विमान अयोध्येला रवाना झाले. या विमानाला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. यादरम्यान, अशी एक घटना घडली ज्यामुळे सर्वजण भावनिक झाले. पंतप्रधान मोदींनी यमुनानगरमधील कैथल जिल्ह्यातील रहिवासी रामपाल कश्यप यांना नवीन बूट भेट दिले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण पंतप्रधान मोदींनी स्वतः हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे.

रामपाल कश्यप कोण आहे : रामपाल कश्यप हे हरियाणातील कैथल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी १४ वर्षांपूर्वी प्रतिज्ञा केली होती की नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत आणि त्यांना भेटणार नाही तोपर्यंत ते बूट किंवा चप्पल घालणार नाहीत. याच रामपाल कश्यप यांची आज पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली आणि त्यांना स्वतःच्या हातांनी बूट घालायला लावले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ते थंडी, उन्हाळा आणि पावसाळ्यातही अनवाणी चालत होते. ते आपल्या निर्धारावर ठाम राहिले. अखेर १४ वर्षांनी त्याचा संकल्प पूर्ण झाला. पंतप्रधान मोदी त्यांना भेटले आणि विचारले, अरे भाऊ, तु हे का केले? तसंच, यावेळी त्यांना बूट घालण्यास मदत करताना, पंतप्रधान मोदींनी भविष्यात अशी प्रतिज्ञा करू नका असे सांगितले. पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी रामपाल कश्यप १४ वर्षे अनवाणी फिरत होते. पंतप्रधानांनी त्यांच्या दृढनिश्चयाचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदींनी स्वतः व्हिडिओ केला पोस्ट : पंतप्रधानांनी स्वतः रामपाल कश्यप यांना बूट घालतानाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला. त्यांनी लिहिले - "आज मला हरियाणातील यमुनानगर येथील कैथल येथील रामपाल कश्यपजींना भेटण्याचे भाग्य लाभले. त्यांनी १४ वर्षांपूर्वी प्रतिज्ञा केली होती की 'मोदी पंतप्रधान होईपर्यंत आणि त्यांना भेटेपर्यंत मी बूट घालणार नाही.'" आज मला त्यांना बूट घालण्याची संधी मिळाली. मी अशा सर्व मित्रांच्या भावनांचा आदर करतो, पण मी त्यांना विनंती करतो की अशी प्रतिज्ञा घेण्याऐवजी त्यांनी काही सामाजिक किंवा राष्ट्रीय कार्य करण्याची प्रतिज्ञा करावी."

हेही वाचा...

  1. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकून टाकतील-मल्लिकार्जुन खरगे
  2. 'ट्रम्प विरोधात मोदी गप्प का? विष्णूचा अवतार ना? सोडा सुदर्शन चक्र' संजय राऊत यांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.