गाजीपूर (लखनौ)- विवाह समारंभात अनेकदा वाद होतात. पण, वरातीत डीजेवरून वाद झाल्यानं थेट वराची हत्या झाल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमधील गाजीपूरमध्ये घडला आहे.
दिलदारनगर पोलीस स्टेशन परिसरातील जगदीशपूर गावात डीजेवर नाचण्यावरून विवाह समारंभात वाद झाला. या वादात ग्रामस्थांनी वरासह त्याच्या आणि त्याच्या वडिलांना काठ्या आणि बंदुकीच्या ठोक्यांनी बेदम मारहाण केली. प्रथमोपचारानंतर जखमी झालेल्या वराला आणि त्याच्या पित्याला गाजीपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं. वराची प्रकृती गंभीर झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर केले. शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान वराचा मृत्यू झाला.
वराची हत्या प्रकरणात 8 जणांविरोधात गुन्हा: वराच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूलसह आरोपीला अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेनंतर परिसरात संतापाचं आणि शोकाकुल वातावरण आहे.
डीजेवरुन नाचताना वाद- सेवराई तहसील परिसरातील त्रिलोकपूर गावातील रहिवासी ब्रिगेडियर राम यांचा मुलगा राकेश कुमार यांचं लग्न जगदीशपूर गावात होणार होतं. लग्नाची वरात 4 जून (गुरुवार) रोजी गावात आली होती. कुटुंबानं वऱ्हाडाचं स्वागत केलं. त्यानंतर सर्व वऱ्हाड डीजेच्या तालावर नाचत वधूच्या घरी पोहोचले. पूजा झाल्यानंतर समारंभाला सुरूवात होणार होती. मात्र, डीजेवर नाचणाऱ्या तरुणांचं भांडण झालं. वाद वाढत असल्याचं पाहून वराचे वडील तरुणांना समजावून सांगण्यासाठी आले. परंतु तरुणांनी वराच्या वडिलांना काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
फटके जोरात लागल्यानं तरुणाचा मृत्यू- वडिलांना मारहाण होताना पाहून वर राकेश त्यांना वाचवण्यासाठी गेला. मद्यधुंद आरोपीनं वर राकेशला काठ्यांनी मारहाण केली. या दरम्यान दुसऱ्या तरुणानं वराच्या डोक्यावर बंदुकीनं वार केले. बंदुकीच्या फटके जोरात लागल्यानं वर गंभीर जखमी झाला. वर बेशुद्ध पडल्यानंतर त्याला गाजीपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेलं. डॉक्टरांनी वराला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान वर राकेशचा मृत्यू झाला. नवीन सुखी जीवनाची स्वप्ने पाहणाऱ्या वराचा अचानक मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-