ETV Bharat / bharat

कमरेला साखळी, हातात बेड्या; तहव्वुर राणाचा लेटेस्ट फोटो आला समोर - TAHAWWUR RANA FIRST PHOTO

दहशतवादी तहव्वुर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणा आता त्याची कसून चौकशी करणार आहेत.

Fresh Images Tahawwur Rana
तहव्वुर राणा फोटो (Office of Public Affairs, US Department of Justice/ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 11, 2025 at 11:27 AM IST

Updated : April 11, 2025 at 11:42 AM IST

1 Min Read

नवी दिल्ली : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा आता भारतात आलाय. गुरुवारी रात्री उशिरा त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्याला १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवण्यात आले आहे. आता सुरक्षा एजन्सी एनआयएची टीम त्याची चौकशी करत आहे. या सगळ्यामध्ये, आज शुक्रवारी त्याचा फोटो समोर आला आहेत, कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमधील अमेरिकन मार्शलनी मंगळवारी राणा याला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पथकाकडं सोपवलं होतं. त्यावेळचे फोटो आता समोर आलेत.

तहव्वुर राणाचे लेटेस्ट फोटो : दहशतवादी तहव्वुर राणा याला अमेरिकेनं भारताकडं सोपवलं आहे. ही प्रक्रिया पूर्ण करतावेळी तहव्वुर राणाचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. तहव्वुर राणाच्या कमरेला साखळी, हातात बेड्या दिसत आहेत. कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमधील अमेरिकन मार्शलनी मंगळवारी राणा याला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पथकाकडं सोपवलं होतं. त्यावेळचे हे फोटो सार्वजनिक व्यवहार कार्यालय, यूएस न्याय विभाग यांनी समोर आणले आहेत.

१८ दिवसांची एनआयए रिमांड : गुरुवारी रात्री उशिरा नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर राणाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला पटियाला न्यायालयात नेण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या सुनावणीनंतर त्याला १८ दिवसांच्या रिमांडवर एनआयएकडं पाठवण्यात आलं. सुरक्षा एजन्सीनं न्यायालयाकडं २० दिवसांची कोठडी मागितली होती.

एनआयए करणार कसून चौकशी : मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक तहव्वुर राणा याला एनआयए मुख्यालयातील एका सेलमध्ये ठेवण्यात आले होते. एनआयए टीम त्याची कसून चौकशी करणा आहे. या एनआयए टीमचं नेतृत्व हे डीआयजी जया रॉय करत आहेत. राणाला भारतात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा :

  1. तहव्वुर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी; दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी
  2. तहव्वूर राणाला खुल्या मैदानात फाशी द्या, कसाबसारखा उशीर लावू नका; हुतात्मा तुकाराम ओंबळेंच्या बंधूंची मागणी
  3. "तहव्वूर राणाला फाशीच द्या"; मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पीडितांची मागणी, सुरक्षेचं मोठं आव्हान

Last Updated : April 11, 2025 at 11:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.