नवी दिल्ली- ट्रम्प टॅरिफच्या भीतीच्या छायेखाली असलेल्या भारतीय शेअर बाजारानं (Stock Market India) अखेर त्यावर मात केली असून, भारतीय शेअर बाजार रिकव्हरी मोडमध्ये येत असल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी मोठ्या घसरणीला सामोरे गेल्यानंतर आज बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराच्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सने 1200 अंकांची वाढ नोंदवली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 350 अंकांच्या जोरदार वाढीसह व्यवहार सुरू केला, व्यवसाय जसजसा वाढत गेला तसतसे ही सुरुवातीची वाढ कमी होत असल्याचे दिसून आलंय. दरम्यान, टाटा स्टील, टाटा मोटर्सपासून ते अदानी पोर्ट्सपर्यंतचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसून आलाय.
सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार सुधारणा : मंगळवारी शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच बीएसई सेन्सेक्सने 73,137.90 च्या मागील बंदच्या तुलनेत 74,013.73 वर उसळी घेतली आणि काही वेळातच तो 74,265.25 च्या पातळीवर पोहोचला आणि व्यवहार होताना दिसला. एनएसई निफ्टीबद्दल बोलायचे झाले तर हा निर्देशांक 22,446.75 वर उघडला, जो त्याच्या मागील बंद 22,161.60 वरून वाढला आणि काही मिनिटांतच तो 22,577.55 च्या पातळीवर पोहोचला.
सुरुवातीच्या वाढीमुळे एका तासात घसरण : बाजारातील सुरुवातीची तेजी एका तासाच्या व्यवहारानंतर मंदावल्याचे दिसून आलंय. सकाळी 10.15 वाजता बीएसई सेन्सेक्स 641 अंकांच्या वाढीसह 73,791 च्या पातळीवर व्यवहार करीत होता, तर एनएसई निफ्टी निर्देशांकदेखील त्याच्या सुरुवातीच्या वाढीपासून घसरला आणि 222 अंकांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसला. पुढील 10 मिनिटांत दोन्ही निर्देशांक आणखी घसरले. सेन्सेक्स 394 अंकांनी वधारला होता आणि निफ्टी 141 अंकांनी खाली आला होता.
TATA सह या 10 शेअर्सनी बाजाराला हादरवून टाकले : शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान लार्ज-कॅप श्रेणीतील 10 शेअर्समध्ये तुफानी वाढ झाली. त्यापैकी टायटन (5.01%), अदानी पोर्ट्स (3.64%), बजाज फिनसर्व्ह (3.05%), टाटा स्टील (3.02%), अॅक्सिस बँक (3%), टाटा मोटर्स (3.24%), एसबीआय (2.79%), झोमॅटो (2.22%), इंडसइंड बँक (2.06%), रिलायन्स (1.20%) यांचे शेअर्स तेजीने व्यवहार करताना दिसून आले. याशिवाय पॉलिसी बाजार शेअर (5.32%), गोदरेज प्रॉपर्टीज शेअर (5.13%), डिक्सन शेअर (4.72%), माझगाव डॉक शेअर (4.47%), आयआरईडीए शेअर (4.14%), एमक्युअर फार्मा शेअर (3.90%) यासारख्या मिडकॅप श्रेणीतील शेअर्समध्ये वाढ झाली, तर स्मॉलकॅप शेअर्समध्ये केडीडीएल शेअर 9.31%, तर बुलेजेट शेअर 7.63% ने वाढला.
काल शेअर बाजार कोसळला : सोमवारी शेवटच्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 71,449 वर उघडला, जो त्याच्या मागील बंद 75,364.69 वरून घसरला आणि लवकरच 71,425 च्या पातळीवर घसरला. जरी शेवटी काही प्रमाणात सुधारणा दिसून आली असली तरीही बीएसई सेन्सेक्स 2226.79 अंकांनी म्हणजेच 2.95 टक्क्यांनी घसरून 73,137.90 वर बंद झाला. सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीनेही ट्रेडिंग दिवसाची सुरुवात 21,758 वर केली, जो त्याच्या मागील बंद 22,904 पेक्षा कमी होता आणि दिवसभरात तो जवळजवळ 1000 अंकांनी घसरून 21,743 वर पोहोचला. शेवटी एनएसई निफ्टीनेही काही सुधारणा दर्शविली आणि 742.85 अंकांनी म्हणजेच 3.24 टक्क्यांनी घसरण होऊन 22,161.60 च्या पातळीवर बंद झाला.
हेही वाचाः
ज्याची भीती होती तेच घडले! सेन्सेक्स उघडताच 3000 अंकांनी कोसळला, टाटा-रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण
महागाईचा आणखी भडका उडणार? केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ