श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील एका गावात दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय सैन्य दलांना मिळाल्यानंतर मोठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या शोधमोहीमेत भारतीय सैन्य दलाच्या जवानांना मोठ्या प्रमाणात शस्रास्त्रं मिळून आली आहेत. मात्र संशयित दहशतावादी पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याची माहिती पुढं येत आहे. परिसरात शोधमोहीम तिव्र करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस, भारतीय सैन्य दल आणि केंद्रीय राखिव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं कठुआ जिल्ह्यातील हिरानगर परिसरात ही कारवाई केली.
#WATCH | J&K: On input regarding the presence of terrorists, a joint operation has been launched by J&K Police and troops of Rising Star Corps in the general area of Saniyal Hiranagar.
— ANI (@ANI) March 23, 2025
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/gYgPNAY3RG
गावात दहशतवादी घुसल्याची मिळाली माहिती : कठुआमधील भारत आणि पाकिस्तान सीमारेषेजवळ असलेल्या सांगला परिसरातील गावात दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय सैन्य दलाच्या जवानांना मिळाली. त्यामुळे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता जम्मू काश्मीर पोलीस दल, केंद्रीय राखिव पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी संयुक्त पथकानं सांगला परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू केली. कठुआतील हिरानगर सेक्टरमध्ये संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकानं दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं. घटनास्थळावर अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली. त्यामुळे सांगला परिसरात शोधमोहीम तिव्र करण्यात आली.
#WATCH | J&K: On input regarding the presence of terrorists, a joint operation has been launched by J&K Police and troops of Rising Star Corps in the general area of Saniyal Hiranagar.
— ANI (@ANI) March 23, 2025
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/p3McfWZ18N
#WATCH | J&K: Visuals from the spot where Indian Army's Romeo Force and Poonch Police launched a joint operation in the general area of Sangla in Surankot, Poonch, in response to suspicious movement in the region.
— ANI (@ANI) March 23, 2025
A recovery of heavy arms, ammunition, IEDs and narcotics was made… https://t.co/LIjuPoP6Mh pic.twitter.com/0dDQxiQhzr
मोठ्या प्रमाणात शस्रास्र आणि दारूगोळा जप्त : कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना चारीबाजुंनी घेरंल आहे. मात्र दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे. घटनास्थळावरुन भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्रास्र जप्त केली आहे. दहशतवादी मोठा घातपात घडवण्याच्या इराद्यानं या परिसरात घुसल्याचा अंदाज सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. "आज दहशतवाद्यांची शोधमोहीम आणखी तीव्र केली जाईल. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रूप, भारतीय सैन्यदल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकांनी हिरानगर इथल्या जंगलातून मोठ्या प्रमाणात शस्रसाठा जप्त केला आहे," अशी माहितीही या अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला दिली.
On 23 March, a recovery of Heavy arms, ammunition, IEDs and Narcotics was made in an intelligence-based joint search operation by the Indian Army and J&K police from Sangla Top, Surankote Poonch, spoiling a major terrorist attempt in Rajouri & Poonch area and disrupting their… pic.twitter.com/aad1nBh6Lm
— ANI (@ANI) March 23, 2025
हेही वाचा :