दंतेवाडा- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला लागू असलेल्या छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवाद्यांचा उपद्रव वाढलाय. त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलानं नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम उघडलीय. छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल अन् नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक सुरू झालीय. दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात ही चकमक होत असून, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना घेरलंय. आतापर्यंत चकमकीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून, शस्त्रेदेखील जप्त करण्यात आलीत.
दोन चकमकीत 30 नक्षलवादी ठार : या घटनेबाबत विजापूरचे एसपी जितेंद्र यादव म्हणाले की, सुरक्षा दलाचे पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी बाहेर पडले होते. यादरम्यान, नक्षलवाद्यांची सुरक्षा दलाच्या एका पथकाशी चकमक झाली. चकमकीच्या ठिकाणावरून तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आलाय. एका सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सकाळी 8 वाजता सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी बाहेर पडले होते, तेव्हा ही चकमक सुरू झाली. 20 मार्च रोजी राज्यातील बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दोन चकमकीत 30 नक्षलवाद्यांना ठार केले होते.
हेही वाचाः
दंतेवाडा-बिजापूर सीमेवर सुरक्षा दलाच्या चकमकीत 20 नक्षलवादी ठार, एक जवानही शहीद