देहरादून : उत्तराखंडमध्ये सातत्यानं हेलिकॉप्टर अपघात घडत आहेत. यावर्षी आतापर्यंत 5 हेलिकॉप्टर अपघात झाले असून यामध्ये 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज सकाळीही केदारनाथहून परतणाऱ्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला. या हेलिकॉप्टरच्या अपघातात पायलटसह 7 जणांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले. अशा परिस्थितीत आता मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीचा वापर केला जाणार आहे.
हेलिकॉप्टर अपघातात जळाले मृतदेह : केदारनाथच्या गौरीकुंड इथं झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले आहेत. त्यामुळे कोणाची ओळख पटवणं कठीण होत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर अपघातातील मृतदेहाचा डीएनए (डीऑक्सीरायबोन्यूक्लिक अॅसिड) चाचणी केली जाईल. डीएनए चाचणी केल्यानंतर प्रशासन मृतदेह ताब्यात देईल, अशी माहिती गढवालचे पोलीस महानिरीक्षक राजीव स्वरूप यांनी दिली.
डीएनए चाचणी म्हणजे काय ? : गौरीकुंड हेलिकॉप्टर अपघातातील मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं आहे. डीएनए चाचणीतूनच कोणाचा मृतदेह आहे? याबाबतची माहिती स्पष्ट होईल. त्यामुळे डीएनए चाचणी म्हणजे काय आणि ती कशी केली जाते, हे आपण जाणून घेऊया. डीएनएला डीऑक्सिरायबोन्यूक्लिक अॅसिड म्हणतात. हा शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये असलेला कोड आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची किंवा प्राण्याची ओळख निश्चित होतो. त्याच्या पालकांकडून डीएनए प्राप्त केला जातो. ही एक वैज्ञानिक पद्धत असून कोणत्याही व्यक्तीची ओळख, नाते किंवा रोग या माध्यमातून शोधता येतो.
डीएनएमुळे स्पष्ट होते ओळख : मृतदेह ओळखता येणं शक्य नसल्यास त्याची डीएनए चाचणी केली जाते. चेहरा किंवा शरीराची ओळखही पटत नाही, तेव्हा शरीरातून डीएनए घेतला जातो. त्यानंतर तो मृतदेहाचा दावा करणाऱ्या कुटुंबाच्या डीएनएशी जुळवला जातो. डीएनए जुळल्यावर शरीराची ओळख निश्चित केली जाते. डीएनए चाचणीसाठी शरीरातून फेमर, ह्यूमरस किंवा बरगड्या, रक्त, केस, दात, त्वचा, नखं किंवा उर्वरित ऊती यासारख्या हाडांचे नमुने घेतले जातात. त्यानंतर जिवंत व्यक्तीच्या म्हणजेच नातेवाईकांच्या गालाच्या आतील थराचे (बकल स्वॅब) नमुने घेतले जातात. त्यानंतर त्यांचा डीएनए जुळवला जातो.
हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावं :
- कॅप्टन राजबीर सिंग चौहान (पायलट), जयपूर
- विक्रम रावत (बीकेटीसी), रानसी, उखीमठ, उत्तराखंड
- विनोद देवी (वय 66 वर्षे), उत्तर प्रदेश
- तृष्टी सिंग (वय १19 वर्षे), उत्तर प्रदेश
- राजकुमार सुरेश जयस्वाल (वय 41 वर्षे), महाराष्ट्र
- श्रद्धा राजकुमार जयस्वाल, महाराष्ट्र
- रशी (वय 10 वर्षे), रहिवासी महाराष्ट्र
हेही वाचा :