ETV Bharat / bharat

चौफेर टीकेनंतर स्टेडियमजवळील चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबीवर गुन्हा दाखल, बंगळुरू पोलीस आयुक्तांचं निलंबन - BANGALORE STAMPEDE

मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी आरसीबी, डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) यांच्या प्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आणि अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

Chinnaswamy stampede
चेंगरीचेंगरीनंतरचे भयावह दृश्य (Source- ETV Bharat Reporter)
author img

By IANS

Published : June 6, 2025 at 7:18 AM IST

Updated : June 6, 2025 at 8:58 AM IST

2 Min Read

बंगळुरू- चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीचा विजयोत्सव पाहण्याकरिता आलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाल्यानंतर कर्नाटक सरकारनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरसीबी फ्रँचाईजी आणि केएससीएसह एव्हेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. तर निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत बंगळुरू पोलीस आयुक्तांसह पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी निलंबन केलं आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (आरसीबी) चषक जिंकल्यानंतर 3 जूनला बंगळुरूमध्ये विजयी समारंभाचं आयोजन करण्यात आलं. या समारंभाला उपस्थित राहण्याकरिता चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू आणि 45 हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेसंदर्भात, क्यूबन पार्क पोलीस ठाण्यानं आरसीबी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कर्नाटक उच्च न्यायालयानंही घेतली दखल- कर्नाटक सरकारनं चेंगराचेंगरी प्रकरणी सीआयडीकडे तपासासह विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेची कर्नाटक उच्च न्यायालयानं स्वयंदखल घेत राज्य सरकारला 10 जूनपर्यंत स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चेंगराचेंगरीची कारणे काय आहेत? भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहेत? याबाबत माहिती देण्याचे उच्च न्यायालयानं कर्नाटक सरकारला आदेश दिले आहेत. 11 जणांच्या मृत्यूनंतर आरसीबीवर कर्नाटक सरकारवर चौफेर टीका होत आहे. अशा स्थिती आरसीबीनं मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनीदेखील मृताच्या कुटुंबांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

प्रकरणाची आयोगाकडून होणार चौकशी- कर्नाटक सरकारनं बंगळुरूचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी (मध्य विभाग) यांच्यासह पाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केलं. प्रथमदर्शनी अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा दाखविल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांचं तत्काल निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी गुरुवारी माध्यमांना दिली. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जॉन मायकल डी कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे.

या पोलीस अधिकाऱ्यांचं झालं निलंबन

  1. क्यूबन पार्क पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक (गिरीश ए.के.)
  2. सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) (बाळकृष्ण)
  3. केंद्रीय पोलीस उपायुक्त (डीसीपी) (एच.टी. शेखर),
  4. स्टेडियम सुरक्षेची जबाबदारी असलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त
  5. बंगळुरू शहर पोलिस आयुक्त (बी. दयानंद)

हेही वाचा-

  1. बेंगळुरु चेंगराचेंगरीप्रकरणी उच्च न्यायालयाची कर्नाटक सरकारवर प्रश्नांची सरबत्ती; कधी होणार पुढील सुनावणी?
  2. RCB नं बेंगळुरु चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या 11 चाहत्यांच्या कुटुंबियांसाठी उचललं मोठं पाऊल; 'अशी' करणार मदत

Last Updated : June 6, 2025 at 8:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.