ETV Bharat / bharat

दिल्लीत साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे दिपवणारे संग्रहालय! लवकरच होणार उद्घाटन, पाहा व्हिडिओ

दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्भुत, अविस्मरणीय आणि प्रेरणादायी असे संग्रहालय साकारण्यात आले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Museum
छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 17, 2025 at 8:20 PM IST

|

Updated : June 17, 2025 at 9:00 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

दिल्ली : राजधानी दिल्लीत 'छत्रपती शिवाजी महाराज इमर्सिव्ह मल्टी-डायमेन्शनल म्यूझियम'चं बांधकाम पूर्ण झालं आहे. पर्यटकांना इतिहास अनोख्या पद्धतीनं दाखवण्यासाठी हे संग्रहालय सज्ज आहे. देशातील तरुणांना या महान राजाच्या जीवनाशी, तत्वज्ञानाशी आणि कामगिरीशी जोडण्यासाठी हे संग्रहालय एक उत्तम उपक्रम आहे. हे संग्रहालय अत्याधुनिक १३डी तंत्रज्ञानावर आधारित आहे.



माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही समिती स्थापन केली होती : वीर योद्धा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राष्ट्रीय समितीची स्थापना १९८१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रायगड येथे शिवाजी महाराजांना त्यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली तेव्हा केली होती. इंदिरा गांधी यांना वाटलं की शिवाजी महाराजांची महानता आणि त्यांचे विचार समाजात अजूनही जिवंत आहेत. या प्रेरणेतून, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचवता यावेत यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज म्यूझियम (ETV Bharat)


हे संग्रहालय कुठे आहे? : हे संग्रहालय दिल्लीतील कुतुब इन्स्टिट्यूशनल एरियामध्ये असलेल्या 'छत्रपती शिवाजी भवन'मध्ये २७,००० चौरस फूट क्षेत्रात बांधले आहे. जे कोणत्याही सरकारी मदतीशिवाय समितीच्या खासगी संसाधनांमधून आणि देणग्यांमधून बांधले गेले आहे. संग्रहालयात 'डार्क राईड' विभाग असेल, जिथे ऑटोमेटेड कारमधून, संग्रहालय पाहण्यासाठी आलेल्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनातील अफझल खानचा वध, आग्र्याहून सुटका, सिंहगड युद्ध आणि दक्षिण विजय यात्रा यासारख्या प्रमुख घटनांचा रोमांचक अनुभव दिला जाईल.

Chhatrapati Shivaji Maharaj Museum
छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम (ETV Bharat)


या संग्रहालयात काय खास आहे : छत्रपती शिवाजी महाराज इमर्सिव्ह मल्टी डायमेंशनल म्यूझियममध्ये शस्त्रास्त्रांची गॅलरी, प्राचीन चित्रांचे प्रदर्शन, रायगड किल्ल्याचे इलेक्ट्रॉनिक मॉडेल आणि १३ डी स्वरुपात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीसोबतच्या नौदल युद्धाचे चित्र देखील आहे. ते शिवाजी महाराजांच्या राष्ट्रवादी भावनेवर, महिलांच्या आदरावर, पर्यावरण संरक्षणावर आणि समानतेच्या तत्त्वांवर प्रकाश टाकेल.

Chhatrapati Shivaji Maharaj Museum
छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम (ETV Bharat)



संग्रहालय तयार करण्यामागील काय आहे उद्देश ? : या संग्रहालयाचे उद्दिष्ट केवळ देशातील पर्यटनाला चालना देणे नाही तर येणाऱ्या पिढ्यांना शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गाथेची जाणीव करुन देणारे ज्ञान केंद्र निर्माण करणे आहे. हे संग्रहालय आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भारताच्या गौरवशाली इतिहासाला जिवंत करण्याचा प्रयत्न आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Museum
छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम (ETV Bharat)


हे संग्रहालय पर्यटकांसाठी कधी खुले होणार? : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. संग्रहालय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्याचं उद्घाटन ६ जून रोजी होणार होतं. मात्र, देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर संग्रहालयाचं उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संग्रहालयाचे उद्घाटन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. लवकरच हे संग्रहालय पर्यटकांसाठी खुलं केलं जाणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Museum
छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम (ETV Bharat)

संग्रहालयाच्या तिकिटाची किंमत किती असेल? : संसंग्रहालयाच्या सरचिटणीसांनी सांगितलं की, लवकरच त्यांचे तिकीट काउंटर उघडले जाईल आणि तिकिटे चार श्रेणींमध्ये विभागली जातील. सरकारी शाळांमधील मुलांसाठी किंमती परवडणाऱ्या असतील, तर परदेशी पर्यटकांकडून थोडे जास्त पैसे आकारले जातील. तिकिटांचे दर अद्याप निश्चित झालेले नाहीत. संग्रहालयाचे उद्घाटन होताच, तिकिटांचे दर जाहीर केले जातील.



हेही वाचा -

  1. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यालगतचा भाग खचला; शिवप्रेमींत संताप
  2. छत्रपतींच्या स्मारकावरून अनिल गोटे-अनुप अग्रवाल यांच्यात आरोप-प्रत्यारोप, काय आहे हा वाद?
  3. कोल्हापुरातील न्यू पॅलेस मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
Last Updated : June 17, 2025 at 9:00 PM IST