चेन्नई - तामिळनाडूत जाऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या महाराष्ट्रातील इराणी टोळीनं दहशत निर्माण केली होती. चेन्नई पोलिसांनी टोळीचा म्होरक्या जफरला चकमकीत ठार केलं. तर टोळीतील अन्य दोन गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आयुक्त अरुण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महाराष्ट्रातील गुन्हेगारांची टोळी नियोजन पद्धतीनं तामिळनाडूत गुन्हे करत होती. टोळीतील गुन्हेगार उच्चभ्रूंची वस्तीत राहणाऱ्या वृद्ध नागरिकांवर हल्ले करून सोन्याची साखळी ओरबाडायचे. २५ मार्च रोजी चेन स्नॅचिंगच्या सहा घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी केलेल्या तपासात गुन्ह्यामागं महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील कुख्यात इराणी टोळीशी असल्याची माहिती समोर आली. काही तासातच पोलिसांनी टोळीतील सूरज आणि जफर या दोन गुन्हेगारांना चेन्नई विमानतळावरून अटक करण्यात आली. तिसरा साथीदार रेल्वेतून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यालाही अटक करण्यात आली.
- पोलीस आयुक्त अरुण म्हणाले, दोन गुन्हेगार विमानानं तामिळनाडूत आले होते. तर तिसरा गुन्हेगार आधीच चेन्नईत होता. त्यांनी कर्नाटकात नोंदणी केलेल्या दुचाकीवरून स्नॅचिंग करण्याचं नियोजन केलं होतं.
आरोपींवर ५० गुन्हे दाखल- पोलिसांनी संशयितांना त्यांच्या बुटांवरून ओळखले. सूरज आणि जफर हे हैदराबादला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना विमानतळ पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे पोलिसांना वेळीच अटकेची कारवाई करणं शक्य झाले. यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांनीही या तीन गुन्हेगारांची ओळख पटवली. तिन्ही आरोपींवर मुंबईत ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आंबिवली परिसरात जफर या आरोपीच्या हाताखाली दोन गुन्हेगार टोळीत काम करत होते.
कसे झाले एन्काउन्टर- पोलिसांकडून चौकशी सुरू असताना जफरनं चोरलेले दागिने तारमणी रेल्वे स्थानकाजवळ लपविल्याचं कबूल केलं. तिरुवनमियुरचे पोलीस निरीक्षक बुखारी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक जफरसोबत घटनास्थळी पोहोचले. तेव्हा आरोपीनं लपवलेले देशी बनावटीचे पिस्तूल काढून पोलीस अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात झाडलेल्या गोळीत त्याचा मृत्यू झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. गंभीर जखमी झालेल्या आरोपीला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आलं.
- पोलिसांनी गुन्हेगाराची बंदूक जप्त केली आहे. २०२१ मध्ये मुंबईत झालेल्या दरोड्यात जफरचा सहभाग असल्याचं तपासात समोर आले. आयुक्त अरुण यांनी तिरुवनमीयुरचे पोलीस निरीक्षक बुखारी, चेन्नई विमानतळ पोलीस आणि ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या धाडसी कारवाईचं कौतुक केलं.