ETV Bharat / bharat

भूपेश बघेल यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी सीबीआयची छापेमारी; राजकीय वर्तुळात खळबळ! - CBI RAIDS CHHATTISGARH

छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागानं (सीबीआय) छापा टाकलाय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

CM Bhupesh Baghel  Residences
भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी सीबीआय (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 26, 2025 at 2:49 PM IST

2 Min Read

दुर्ग : छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागानं (सीबीआय) छापा टाकलाय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. यापूर्वी १५ दिवसांपूर्वी म्हणजेच १० मार्चला ईडीचं पथक भूपेश बघेल यांच्या घरी पोहोचले होतं. दरम्यान, दुर्ग जिल्ह्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या घरीही सीबीआयचं पथक पोहोचल्याची माहिती समोर आलीय. यासंदर्भात सीबीआयनं एक प्रेस रिलीज जारी केलीय. यामध्ये म्हटलंय की, सीबीआयच्या पथकानं छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्ली येथील ६० ठिकाणी छापेमारी केलीय. ज्यामध्ये राजकारणी, सरकारी अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी सीबीआय : सीबीआयचं पथक भूपेश बघेल यांच्या पदुमनगर येथील निवासस्थानी दाखल झालंय. याशिवाय, सेक्टर ५ चे आमदार देवेंद्र यादव यांच्या घरीही सीबीआय पोहोचलीय. यावेळी, जवळपास अडीच तास वाट पाहिल्यानंतर सीबीआयला आमदार देवेंद्र यादव यांच्या घरात प्रवेश करता आला. मात्र, भिलाई महानगरपालिकेचे महापौर नीरज पाल, एमआयसी सदस्य आदित्य सिंह, अफरोज खान, शरद मिश्रा यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना घरात प्रवेश दिला नाही.

दुर्ग रायपूरमध्ये सीबीआयची छापेमारी : दुर्ग जिल्ह्यातील १६ ठिकाणी सीबीआयनं छापे टाकल्याची माहिती समोर आलीय. यामध्ये माजी पोलीस महानिरीक्षक डॉ. आनंद छाब्रा, आयपीएस प्रशांत अग्रवाल, आयपीएस अभिषेक माहेश्वरी यांचाही समावेश आहे. भिलाईमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय ध्रुव यांच्या ३२ येथील बंगल्यांवर सीबीआयनं छापा टाकलाय. तसंच, सेक्टर ९ रोड १७ येथील पोलीस महानिरीक्षक डॉ. आनंद छाब्रा आणि अभिषेक पल्लव यांच्या बंगल्यांवर, राजधानी रायपूरमधील पोलिस महानिरीक्षक शेख आरिफ आणि प्रशांत अग्रवाल यांच्या बंगल्यांवर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिषेक माहेश्वरी आणि अनिल तुतेजा यांच्या भिलाई ३ येथील बंगल्यावर सीबीआयनं छापेमारी केलीय.

भूपेश बघेल यांची सोशल मीडियावर पोस्ट : भूपेश बघेल यांच्या कार्यालयानं सीबीआयच्या छाप्याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलीय. यात लिहिलंय की, "आता सीबीआय आलीय. दरम्यान, ८ आणि ९ एप्रिल रोजी अहमदाबाद (गुजरात) येथे होणाऱ्या एआयसीसी बैठकीसाठी स्थापन केलेल्या 'मसुदा समिती' च्या बैठकीसाठी आज माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे दिल्लीला जाणार आहेत. त्यापूर्वी, सीबीआय आधीच रायपूर आणि भिलाई निवासस्थानी पोहोचलीय."

...हा तर राजकीय द्वेषातून : भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी टाकलेल्या सीबीआयच्या छाप्याबद्दल, माजी उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांनी भाष्य केलंय. त्यांनी एक्सवर लिहिलंय की, "भूपेशजींची प्रतिमा खराब करण्याचा भाजपचा हा केवळ एक अयशस्वी प्रयत्न आहे. राज्यातील भाजप सरकार छत्तीसगड राज्य चालवण्यास असमर्थ असल्याचं सिद्ध होतंय. त्यामुळं जनतेशी संबंधित मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी ते असे प्रयत्न करतंय. आधी ईडी, नंतर सीबीआय. तपास यंत्रणांना भाजपची बी टीम म्हणून काम करण्यासाठी वेळ नाही. राजकीय द्वेषातून केलेली भाजपची ही कृती लोकशाहीचे उल्लंघन आहे."

काँग्रेसचा भाजपवर आरोप : भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी सीबीआयनं केलेल्या कारवाईवर काँग्रेसनं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. "राजकीय सूडबुद्धीमुळं ही कारवाई करण्यात आलीय. भूपेश बघेल यांना पंजाबचे प्रभारी बनवल्यापासून भाजप घाबरलीय. त्यामुळेच मोदी सरकार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे", असा आरोप काँग्रेस मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुशील आनंद शुक्ला यांनी केलाय.

हेही वाचा :

  1. 'कुणाल कामरानं गाणं लिहिलं तर शिंदे गँगला मिरची लागली'; संजय राऊतांचा हल्लाबोल
  2. "हे कसलं मोदींचं हिंदुत्व? एकिकडं औरंगजेबाची कबर अन्...", हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका
  3. अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; विरोधी पक्षनेतेपदाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.