नवी दिल्ली : गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात ईडीनं प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती तथा उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. यावेळी रॉबर्ट वाड्रा यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना रॉबर्ट वाड्रा यांनी, "केस मे कुछ नही है यार," असं म्हणत त्यांनी अमलबजावणी संचालनालय (ED) विभागाबाबत नाराजी व्यक्त केली.
" case mein kuch nahin hai": robert vadra after reaching ed office for questioning in gurugram land case
— ANI Digital (@ani_digital) April 15, 2025
read @ANI story | https://t.co/xwqSy7YF1Z#RobertVadra #ED #Gurugramlandcase pic.twitter.com/tpXgdymuEr
केस मे कुछ नही है यार - रॉबर्ट वाड्रा : गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात ईडीनं रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना मंगळवारी दिल्ली इथल्या अमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं. यावेळी रॉबर्ट वाड्रा यांनी प्रसार माध्यमांकडं बोलताना चांगलीच नाराजी व्यक्त केली. "केस मे कुछ नही है यार, मला आशा आहे की आता काहीतरी निष्कर्ष निघेल. मात्र मी जेव्हा नागरिकांच्या हिताच्या गोष्टी बोलतो, की सरकारवर टीका करतो, तेव्हा ईडीचे अधिकारी मला फोन करतात. मी देशाच्या बाजूनं बोललो किंवा मूळ मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्यासाठी अधिकारी मला बोलावतात. भाजपाकडून राजकीय सूड उगवला आहे," असा आरोप रॉबर्ट वाड्रा यांनी यावेळी केला.
" political vendetta," says businessman robert vadra as he appears before ed in gurugram land case
— ANI Digital (@ani_digital) April 15, 2025
read @ANI story | https://t.co/rCW7V8Cqwp#RobertVadra #ED #Gurugramlandcase pic.twitter.com/oniRafPc9L
लोक माझ्यावर प्रेम करतात : लोक माझ्यावर प्रेम करतात म्हणून मी राजकारणात यावं, अशी लोकांची इच्छा आहे. मात्र जेव्हा मी राजकारणात येण्याची तयारी करतो, तेव्हा ते मला खाली खेचण्यासाठी प्रयत्न करतात. मूळ मुद्द्यांपासून दूर करण्यासाठी जुने मुद्दे उकरुन काढतात," असं रॉबर्ट वाड्रा यांनी यावेळी सांगितलं. मी अमलबजावणी संचालनालय कार्यालयात अनेकदा उपस्थित राहिलो. मात्र आतापर्यंत या चौकशीत मागील 20 वर्षापासून काहीही उघड झालं नाही. मला 15 वेळा समन्स बजावण्यात आलं आहे. 10-10 तास बसलो आहे. तब्बल 23000 कागदपत्रं सादर केली आहेत. आता ते एका आठवड्यात 23 हजार कागदपत्रं मागतात. मात्र 23 हजार पत्र जमा करणं सोप्पं नाही," असं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांना हे दुसरे समन्स आहे. त्यांना यापूर्वी ८ एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते.
हेही वाचा :
- गांधी कुटुंबाचे जावई बाप्पू उतरणार निवडणुकीच्या मैदानात; रॉबर्ट वाड्रा म्हणाले 'अनेक पक्षांच्या आहेत ऑफर' - Lok Sabha Election 2024
- No Clean Chit To Robert Vadra : जमीन व्यवहारात रॉबर्ट वाड्रा यांना क्लीन चिट नाही, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांतर्फे खुलासा
- Robert Vadra Money Laundering Case: रॉबर्ट वाड्रांवर अटकेची टांगती तलवार.. १५ दिवसांसाठी अटकेपासून दिलासा