गुवाहाटी : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा, कुशियारा आणि कपिली या नद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या नद्यांना आलेल्या पुरामुळे आतापर्यंत बाधित झालेल्या तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. आसामच्या पुरात 17 जणांचा तर भूस्खलनात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही सूत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे.
आसामच्या पुरात शनिवारी दोघांचा मृत्यू : आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या मृतांची संख्या 23 वर पोहोचली आहे. शनिवारी दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ASDMA नुसार यावर्षी आसाममधील पुरात 17 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इतके नागरिक झाले बाधित : गुवाहाटीमध्ये शनिवारी भूस्खलनात एका नागरिकाचा मृत्यू झाला. गुवाहाटीतील पुरात आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मते, पुरामुळे 12 जिल्ह्यांमधील 41 मंडळं आणि 999 गावांमध्ये 3,37,358 नागरिक प्रभावित झाले आहेत. श्रीभूमीमध्ये सर्वाधिक 1,93,244 लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. त्यानंतर हैलाकांडीमध्ये 73724 आणि काचरमध्ये 56,398 नागरिक प्रभावित झाले आहेत.
पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये 201 मदत शिबिरं : पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रशासनानं 201 मदत शिबिरं स्थापन करण्यात आली आहेत. या मदत शिबिरात 1.47 लाख नागरिकांनी आश्रय घेतला आहे. 1,91,192 जनावरं पुरामुळे बाधित झाली आहेत. 12,659 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. धुबरी इथल्या ब्रह्मपुत्रा, धरमतूल इथल्या कपिली, बीपी घाट इथल्या बराक आणि श्रीभूमी इथल्या कुशियारा नदीच्या पाण्याची पातळी अजूनही धोक्याच्या पातळीच्यावर आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा :