ETV Bharat / bharat

इराण-इस्रायलच्या युद्धाचा भारतीयांवर गंभीर परिणाम होईल-असदुद्दीन ओवैसी

इराण- इस्त्रायलच्या संघर्षात अमेरिकेनं उडी मारल्यानं मध्य पूर्वेत तणावाची स्थिती झाली आहे. त्यावर असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

asaduddin owaisi
असुद्दीन ओवैसी (Source- ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 22, 2025 at 5:10 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद - पश्चिम आशियात पूर्ण युद्ध सुरू झाल्यास भारताच्या आर्थिक हितसंबंधांवर तसेच मध्य पूर्वेत राहणाऱ्या १ कोटी ६० लाखांहून अधिक भारतीयांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांनी वॉशिंग्टनमध्ये जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबलचा जागतिक शांतता पुरस्कार मिळावा, अशी पाकिस्ताननं शिफारस केली. मात्र, अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळावर हल्ले केल्यानं पाकिस्तानवर जगभरातून टीका होत आहे.

आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे, १ कोटी ६० लाखांहून अधिक भारतीय लोक आखाती आणि मध्य पूर्वेत राहतात. या प्रदेशात दुर्दैवानं युद्ध खूप शक्यता आहे. त्या युद्धाचा तेथे राहणाऱ्या भारतीयांवर गंभीर परिणाम होईल-ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी

असुद्दीन ओवैसी म्हणाले, " ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळवून द्यायचा आहे का? हे आपण पाकिस्तानी लोकांना विचारलं पाहिजे. पाकिस्तानचे जनरल (लष्करप्रमुख असीम मुनीर) यांनी यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत जेवण केले होते का? आज त्याचा भांडाफोड झाला आहे." भारताला भेडसावू शकणाऱ्या आर्थिक धोक्यांवरही प्रकाश टाकला. "भारतीय कंपन्यांनी सर्व अरब देशांमध्ये किंवा आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्या परकीय गुंतवणुकीचा मोठा भाग या प्रदेशातून येतो," असे खासदार ओवैसी यांनी म्हटलं.

गाझामध्ये नरसंहार सुरू- ओवैसी यांनी इराणच्या आण्विक तळावरील अमेरिकेच्या हल्ल्यांची तुलना अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इराकवरील हल्ल्याशी केली. त्यावेळीदेखील इराकमध्ये मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्र असल्याबद्दलचे अमेरिकेचे दावे खोटे ठरले अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना मदत झाली आहे. ते पॅलेस्टिनींची कत्तल करणार आहेत. गाझामध्ये नरसंहार होत असताना अमेरिकेला त्याची चिंता नसल्याचं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

आयएएफचा इराणवर हल्ला- इस्रायलच्या हवाई दलानं (आयएएफ) रविवारी पश्चिम इराणमधील लष्करी तळांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. त्याबाबत इस्रायल संरक्षण दलानं (आयडीएफ) म्हटलं, "आयएएफनं पश्चिम इराणमधील सैन्यदलाच्या तळावर अनेक हल्ले सुरू केले आहेत. याशिवाय, आज सकाळी, आयएएफनं इराणी सशस्त्र दलाच्या सैनिकांवर हल्ला करण्यासाठी तयार असलेल्या क्षेपणास्त्र लाँचर्सवर हल्ला केला. दुसरीकडं इस्रायली भूभागावर क्षेपणास्त्र डागणाऱ्या इराणच्या लाँचर्सना ताबडतोब निष्क्रिय करण्यात आले.

हेही वाचा-

  1. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने पुन्हा इस्रायलवर डागली क्षेपणास्त्रे, अमेरिकेलाही दिला गंभीर परिणामांचा इशारा
  2. अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला; ट्रम्प म्हणाले, इराणचे तीन प्रमुख अणु प्रकल्प बॉम्ब हल्ल्यानं केले उद्ध्वस्त