हुबळी (कर्नाटक): पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्काराचा प्रयत्न आणि खून करणारा आरोपी रविवारी पोलीस चकमकीत ठार झाला. मृत आरोपीचे नाव रक्षित क्रांती असे आहे, तो मुळचा बिहारचा रहिवासी आहे.
येथील अशोक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आणि मुलीचा मृतदेह एका पडक्या इमारतीत आढळला, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं वृत्त आहे. मात्र याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. यासंदर्भात वैद्यकीय तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या तापसणीनंतर त्यातून यासंदर्भात नक्की लैंगिक अत्याचार झाला की नाही हे समजू शकणार आहे.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिसरातील रहिवाशांनी अशोक नगर पोलीस ठाण्यासमोर जमून न्यायाची मागणी करत निदर्शने केली. "मुलीच्या पालकांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल," असे हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन शशी कुमार यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
पीडितेचे कुटुंब कोप्पल जिल्ह्यातील आहे. तिची आई घरकाम करणारी आणि ब्युटी पार्लरमध्ये सहाय्यक म्हणून काम करते, तर पीडित मुलीचे वडील रंगकाम करतात, असेही त्यांनी सांगितले.
"या प्रकरणातील पीडितेची आई तिच्या मुलीला कामावर घेऊन गेली होती. ती राहते त्या परिसरातील घरांमध्येच ती काम करत होती. एका अज्ञात व्यक्तीने मुलीला तिथून पळवून नेले होते. तिचा शोध घेतला असता, मुलगी घरासमोरील एका लहान चादरीच्या छताच्या इमारतीच्या बाथरूममध्ये आढळून आली. तिला ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी ती मृत असल्याचं सांगितलं" अशी माहिती पोलिसांनी दिली.