Kalavya Saline Land : कळव्यातील खारभूमी जमिनीवर भुमाफीयांचा कब्जा, जितेंद्र आव्हाडांचा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा
Published on: May 11, 2022, 1:13 PM IST

ठाणे - ठाण्यातील कळवा येथे 72 एकर शासकीय जमीन ( Kalavya Saline Land ) आहे, परंतु ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या अगोचरपणामुळे भूमाफिया ही जागा बाळकावत आहे. शासकीय अधिकार्यांकडून या जमिनी त्यांच्या मालकीच्या असल्याचे सांगितले जात आहे, परंतु या सर्व जागेचा सर्वे झाला नसतांना देखील जमिनी बळकावल्या जात आहेत. आणि असच जर चालत राहिल तर यावर अँटी करप्शनची चौकशी लावली पाहिजे. या भरणीमुळे येत्या काळात पावसाळ्यात संपूर्ण कळवा पाण्याखाली जाऊ शकतो. असा इशारा यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे, तर यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना आपल्या अधिकार्यांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.
Loading...