व्हिडिओ...बारामतीत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस....
Published on: May 11, 2022, 9:41 PM IST

बारामती (पुणे) - जिल्ह्यातील बारामतीत आज दि.11 मार्चला सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. उन्हाच्या चढत्या पाऱ्यामुळे निर्माण झालेल्या उकाड्याने बारामतीकर नागरिक हैराण झाले होते. आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वारे असल्याने शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.
Loading...