Cloudburst Situation In Nanded : नांदेड शहरासह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस
Published on: Jul 9, 2022, 10:07 AM IST |
Updated on: Jul 9, 2022, 11:48 AM IST
Updated on: Jul 9, 2022, 11:48 AM IST

नांदेड - नांदेडमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस ( Heavy rains in Nanded ) कोसळतोय, त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले ( waterlogged on road ) आहे. या जोरदार पावसामुळे अनेक शाळांनी आज सुट्टी जाहीर( Schools declared holiday ) केली आहे. नांदेड शहरासह अनेक जागी ढगफुटी सदृश्य पाऊस ( Cloudburst Situation ) झाला आहे. तर पावसाची संततधार अद्याप सुरूच आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल आहे. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे. दरम्यान, नांदेडमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफचे एक पथक तैनात ( Deployed NDRF squad ) ठेवण्यात आलेले आहे. तसेच ओढे आणि नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. नांदेड शहरातील पद्मजा सिटी परिसरात पावसामुळे नागरिकांना घरी जाता येत नाही प्रशासनाकडून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.त्यामुळे अगोदरच पाण्याअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना पून्हा तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्यामुळे पिकांसह शेतीही खरडून गेली आहे. अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरले आहे. तर तालुक्यातील शेलगाव खु., शेलगाव बु., शेणी, कोंढा, देळूब खु.देळूब बु. सह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
Loading...