ST Worker Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे बोंबाबोंब अर्धनग्न आंदोलन; वेधले राज्य सरकारचे लक्ष

By

Published : Nov 19, 2021, 4:49 PM IST

thumbnail

अकोला - खामगाव एसटी आगारातील (Khamgaon ST Depot) कर्मचारी विशाल अंबलकार (ST Worker Vishal Ambalkar) यांनी निलंबनाच्या भीतीने विष पिऊन आत्महत्या केली होती. त्याचा अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. विशालची आत्महत्या नाही. तर व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. या सरकारला कधी जाग येणार असा सवाल कर त संतप्त कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न बोंबाबोंब आंदोलन (Half-naked bombabomb agitation) सुरू केले आहे. राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या वीस दिवसांपासून हा संप (ST Worker Strike) करीत आहेत. अकोल्यातही या संपामध्ये एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अर्धनग्न आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले. तसेच राज्य सरकारने आमची मागणी मान्य करावी, यासाठी हे आंदोलन केले असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तर या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी बोंबाबोंब आंदोलन करीत राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे हित जोपासत एसटीला लवकरात लवकर राज्य सरकारमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची होती.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.