Yavatmal Police : यवतमाळ जिल्ह्यातील 'या' पोलीस ठाण्याचे सर्व कामकाज आहे महिलांच्या हाती

By

Published : Jan 11, 2022, 4:20 PM IST

thumbnail

यवतमाळ - महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. पोलीस शिपाई ते आयपीएस अधिकारी म्हणून त्या यशस्वीपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आता तर महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर संपूर्ण पोलीस ठाण्याची धुरा देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात लोहारा पहिले महिला पोलीस ठाणे ठरले आहे. लोहारा पोलीस ठाण्यातील सर्व कारभार महिला पोलीस पाहतात. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील हे पाऊल उचलले आहे. धडक कारवाई असो किंवा पेट्रोलिंग हे महिला पोलीस कर्मचारी करणार आहे. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या नागरिकांचे समुपदेशन किंवा क्लरिकल कार्यच महिलांना दिले जात होते. आता मात्र त्या सर्वांना सक्षम करण्याचे कार्य पोलीस विभागकडून होत आहे. या बाबीचा पोलिसांकडून कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.