Election of Konkan Division : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

By

Published : Jan 4, 2023, 9:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

thumbnail

ठाणे : भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग विधान परिषदेच्या शिक्षक ( Strict Implementation of Code of Conduct in Election ) मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर केली असून, जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी ( Election of Konkan Division Teacher Constituency ) राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. जिल्हाधिकारी शिनगारे ( Election of Konkan Division Teacher Constituency ) म्हणाले की, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतपत्रिकेद्वारे मतदान होणार ( Collector Shingare ) आहे. या मतदारसंघासाठी जिल्ह्यात 20 मतदान केंद्रे असणार आहेत. तसेच जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीत जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती व भरारी पथक स्थापन करण्यात येत आहेत. तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात येत असून, या पथकांमार्फत राजकीय पक्ष/लोकप्रतिनिधी यांच्या दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही, याबाबत पर्यवेक्षण करण्यात येईल. विभागीयस्तरावर चोवीस तास चालू असलेला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.