PM Modi With Children : पंतप्रधान मोदी चिमुकल्यांसाठी बनले 'जादूगार मोदी'; मस्तीही केली, पाहा व्हिडिओ
रांची (झारखंड) PM Modi With Children : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अनोख्या कृतीनं नेहमीच चर्चेत आसतात. अशातच त्यांच्या आणखी एक अनोखा अंदाज पाहायला मिळालाय. यावेळी मोदींनी चिमुकल्यांसोबत मजा, मस्ती अन् धमाल केलीय. इतकंच नाही तर लहान मुलांसाठी ते जादूगारही झाले. त्यांनी चिमुकल्यांनी नाण्याची एक भन्नाट जादूही दाखवली. त्यांच्या जादूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोदींना चिमुकल्यांबद्दल विशेष प्रेम, आपुलकी असून ते नेहमीच मुलांना प्रोत्साहन देत असतात.
मोदी बनले जादूगार : मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून सर्वत्र याचीच चर्चा रंगलीय. यात पंतप्रधान दोन लहान मुलांसोबत मजा करताना दिसत आहेत. त्यांनी एक नाणं घेतलं आणि मुलांना त्यासंबंधीत एक जादूही करून दाखवलीय. मुलांसोबत घालवलेले काही अविस्मरणीय क्षण असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केलाय. पंतप्रधान मोदींनी एका कुटुंबाची भेट घेतली. या कुटुंबातील दोन मुलंही पंतप्रधानांना भेटण्यासाठी आली होती. पंतप्रधानांनी या मुलांसोबत खूप मस्ती केली. त्यांनी एक नाणं घेतलं आणि ते आपल्या कपाळावर चिटकवलं. त्यानंतर मुलांना जादू दाखवली. त्यानंतर मुलांनाही तसंच करायला लावलं. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.