Ganesh Puja Tragedy: गणेश मिरवणुकीत 'या' कारणामुळं झाला विद्यार्थ्याचा मृत्यू, पाहा व्हिडिओ
कटक (ओडिसा) Ganesh Puja Tragedy : राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये गणेश पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. गणेश मिरवणुकीदरम्यान ओडिसातील कटक येथील एका खासगी विद्यापीठात दुर्घटना घडलीय. आज गणेश मिरवणुकीदरम्यान नारज येथील खासगी विद्यापीठातील एका विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर अन्य दोघांची प्रकृती गंभीर आहे. रोहन भगवान सावळे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तो महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी गणपतीची मूर्ती ट्रॅक्टरवर घेऊन जात होते. तेव्हा ते विद्युत तारांच्या संपर्कात आले होते. विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना गंभीर अवस्थेत उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. (student died due to electric shock)