Fire in Vaishali Express : उत्तर प्रदेशात 24 तासांत दुसऱ्यांदा 'द बर्निंग ट्रेन'चा थरार! वैशाली सुपरफास्ट एक्स्प्रेसला आग, पाहा व्हिडिओ
इटावा Fire in Vaishali Express : छठ पुजेपूर्वी उत्तर प्रदेशातील इटावा इथं गेल्या 12 तासांत दुसरी रेल्वे दुर्घटना घडलीय. नवी दिल्लीहून दरभंगाला जाणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसनंतर आता वैशाली सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या बोगीलाही आज पहाटे इटावामध्ये आग लागली. पॅन्ट्री कारच्या शेजारी असलेल्या एस-6 बोगीत ही आग लागली. या घटनेनंतर गोंधळ उडाला. या अपघातात 19 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी दिल्लीहून सहरसाकडे जाणाऱ्या वैशाली सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या एस-6 बोगीमध्ये आग लागली. 12 तासांच्या आत दुसऱ्या ट्रेनमध्ये आग लागल्याच्या वृत्तानं प्रवाशांमध्ये भिती निर्माण झालीय. आग लागताच लोक आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करु लागले. यातील 11 प्रवाशांना सैफई वैद्यकीय महाविद्यालयात तर आठ प्रवाशांना भीमराव आंबेडकर संयुक्त रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय.