साईबाबांच्या मंदिरात दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा; पाहा व्हिडिओ - Shri Saibaba Mandir
🎬 Watch Now: Feature Video


Published : Dec 26, 2023, 10:49 PM IST
शिर्डी Datta Jayanti 2023 : देशभरात आज दत्त जन्मोत्सव (Datta Janmotsav) मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही (Shri Saibaba Mandir) मोठ्या श्रध्देने आणि उत्साहात दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडला. साई मंदिरात चांदीच्या पाळण्याला फुलांची सजावट करून त्यात दत्तात्रेयांची चांदीची मूर्ती ठेवत दत्त जन्माचा कीर्तन सोहळा पार पडला. संध्याकाळी सहा वाजता साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलहुळे यांनी सपत्नीक पाळणा हलवत दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा केला. आज दिवसभर साई समाधीवर श्री दत्त यांचा फोटो ठेवून त्याची पूजा करण्यात आली. दत्त जन्मोत्सवाची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. साईबाबांना श्रीदत्त अवतार मानत या पावन दिवशी एक लाख भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं आहे. दत्त जन्मोत्सव साजरा होऊन साईबाबांच्या धूप आरती झाली.