Cobra Snake : बाबो ..! कबुतरांच्या पिंजऱ्यात शिरला नाग अन्... पहा व्हिडिओ
ठाणे : पावसाळ्याच्या दिवसात जंगलात सापांच्या बिळात पाणी साप बिळाबाहेर येतात. तसंच अन्नाच्या शोधात काही बिनविषारी साप मानवी वस्तीत शिरल्याच्या घटना घडताना आपण पाहतो. अशीच एक घटना कल्याण पश्चिमेकडी परिसरात घडली आहे. विषारी कोब्रा सापानं कबुतराच्या पिंजऱ्यात घुसून त्याला भक्षण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कल्याण पश्चिमेकडील ग्रामीण भागात जंगले, शेती नष्ट करून मोठमोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. याशिवाय जिल्ह्यातील वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळं गेल्या काही दिवसांपासून शिकारीच्या शोधात विषारी, बिनविषारी साप मानवी वस्तीत शिरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच प्रमोद कारभारी हे कल्याण पश्चिम भागातील उंबर्डे गावातील हिराचा पाडा येथे राहतात. त्यांना वेगवेगळ्या जातीच्या कबुतरांचं पालनपोषण करण्याची आवड असल्यानं त्यांनी घरासमोरील शेडमध्ये कबुतरांसाठी पिंजऱ्यात विविध जातींची कबुतरे ठेवली आहेत. मात्र, सकाळच्या सुमारास अचानक प्रमोद यांना कबुतरांच्या पिंजऱ्यात कोब्रा नाग दिसला. त्यांनी या विषारी नागाला हुसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोब्रा नागानं पिंजऱ्यात एका कबुतरालाच भक्ष केलं. त्यांनतर प्रमोद यांनी पिंजऱ्यात नाग असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. सर्पमित्र दत्ता यांनी कोब्रा नागाला पकडून पिशवीत बंद केल्यानं कारभारी कुटूंबानी सुटकेचा निश्वास घेतला.