VIRAL VIDEO : नवनाथ दौंड यांचा व्हीडीयो व्हायरल, भाजप कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचा आरोप

By

Published : Nov 23, 2021, 6:43 PM IST

thumbnail

जालना - जालन्यातील भोकरदनचे शिवसेना तालुका प्रमुख नवनाथ दौड यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. नवनाथ दौड हे जालना जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे सदस्य आहे. जिल्हा परिषद गटात विकासकामे करताना भाजप नेत्यांच्या सांगण्यावरुन कामात अडथळा आणत असल्याचा आरोप दौड यांनी केलाय. स्मशानभूमीसह सिंगल फेज योजनेच्या कामात भाजप कार्यकर्ते अडथळे आणत आहेत. कामे केल्यास कुटुंबासह जीवे मारून टाकू अशा धमक्या भाजप कार्यकर्त्यांनी दिल्याचा आरोप दौड यांनी केला आहे. भाजपचे कार्यकर्ते सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. धमक्या देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात भोकरदन पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे. नवनाथ दौंड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे. गेल्या 5 वर्षात त्यांनी जिल्हा परिषद सदस्य राहूनही कोणतीही कामे केलेली नाही. त्यामुळे आता निवडणुका जवळ आल्यानं सहानुभूती मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांवर आरोप केल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.