अकोल्यात बाराभाई गणपतीचे झाले विसर्जन

By

Published : Sep 19, 2021, 7:10 PM IST

Updated : Sep 20, 2021, 12:14 PM IST

thumbnail

अकोला - गेल्या दहा दिवसांपासून विराजमान असलेल्या गणपतींना रविवारी जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. अकोल्यातील मानाच्या बाराभाई गणपतीची महापूजा केल्यानंतर विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीचा कुठलाही गाजावाजा न करता या गणपतीचे विसर्जन झाले. कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने गणपती मिरवणुकीवर प्रतिबंध आणले आहे. मात्र, गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर कलम 144 लागू करण्यात आलेली असून या मार्गावर पोलिसांचा नेहमीप्रमाणे बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, हे विशेष. दरम्यान, अकोल्यातील मानाच्या बाराभाई गणपतीची महापूजा करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ऍड. मोतिसिंह मोहता यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांची उपस्थिती होती. महापूजा करण्यात आल्यानंतर साधेपणाने गणपती विसर्जन करण्यात आले. दरम्यान, पूजेवेळी जुने शहर पोलिसांची उपस्थिती होती.

Last Updated : Sep 20, 2021, 12:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.