मुंबई : एअर इंटेलिजन्स युनिटने पकडले 18 कोटींचे ड्रग्स
Published on: Sep 24, 2021, 7:49 PM IST

मुंबई - एअर इंटेलिजन्स युनिटची (एआययू)ने मोठी कारवाई केली असून, 18 कोटींचे ड्रग्स पकडले आहेत. एआययूला झांबियाहून मुंबईकडे येणारी एक महिला प्रवासी ड्रग्सची मोठ्या प्रमाणावर तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे टीमने सापळा रचून 40 वर्षीय विदेशी महिलेला अटक केली. आणि तिच्याकडून 3 किलो 584 ग्रॅम हेरॉईन ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे मूल्य 18 कोटी रुपये एवढे आहे. आरोपी महिला प्रवासी ही (zambian citizen) झांबियन नागरिक आहे.
Loading...