Palmerian Dog : दीड लाख रूपये किंमतीचा पामेरियन जातीचा टॉय पाम श्वॉन ठरला आकर्षण, पाहा व्हिडिओ
Published on: Nov 28, 2022, 9:03 PM IST

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमध्ये आयोजित केलेल्या यशवंत कृषी, औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शनात इवलासा पामेरियन श्वॉन सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. पांढर्या शुभ्र टॉय पामची वैशिष्ट्यच अशी आहेत की लोकांना त्याच्या बरोबर सेल्फी आणि व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही. पामेरियन जातीच्या टॉय पामची Toy Pam Palmerian Dog उंची ११ इंच आणि वजन अवघे ३ किलो आहे. केवळ एक चमचा भात आणि एक चमचा दही, एवढेच त्याचे खाद्य. जन्मानंतर साधारणत: दहा महिन्यात या श्वानाची पूर्ण वाढ होते. वारूंजी (ता. कराड) येथील जगदीश धुमाळ याने टॉय पामला श्वान स्पर्धेसाठी आणले आहे. त्याला पाहण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी लहान मुलांसह महिला, युवतींची झुंबड उडाली आहे. पाहूयात...
Loading...