MP Pratap Patil Chikhlikar राहुल गांधी यांची यात्रा म्हणजे संपत्तीचे प्रदर्शन - प्रताप पाटील चिखलीकर
Published on: Nov 21, 2022, 12:37 PM IST

नांदेड राहुल गांधी यांची पदयात्रा Rahul Gandhis Walk म्हणजे संपत्तीचे प्रदर्शन आहे, अशी टीका खासदार प्रताप पाटील चिखलीकर MP Pratap Patil Chikhlikar यानी केली. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे आयोजित एका आरोग्य शिबीरात ते बोलत होते. नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा हि महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात दाखल झाली. त्यावेळेला पंचतारांकित हॉटेल विश्रामगृह हे सगळे काँग्रेसच्या लोकांसाठी आरक्षित केले होते. तसेच राहुल गांधी यांचासाठी वातानुकूलित मंडप देखील उभारले होते. राहूल गांधी यांच्या यात्रेसाठी फाईव्ह स्टार हॉटेल सारखी व्यवस्था होती. पंढरपूरची यात्रा राहुल गांधी यांनी कधी पहिली का, असा प्रश्न त्यांनी केला. या ठिकाणी काँग्रेस थोडीफार जिवंत आहे. त्याच ठिकाणी यात्रा गेली असे चिखलीकर म्हणाले.
Loading...