World Patient Safety Day 2023 : जागतिक रुग्ण सुरक्षा दिन 2023; जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस, महत्त्व आणि यंदाची थीम

World Patient Safety Day 2023 : जागतिक रुग्ण सुरक्षा दिन 2023; जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस, महत्त्व आणि यंदाची थीम
World Patient Safety Day 2023 : जगभरातील रुग्णांच्या सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस साजरा केला जातो.
हैदराबाद : World Patient Safety Day 2023 रुग्णांची काळजी घेणं आणि त्यांचं संरक्षण करणं हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. डॉक्टर रुग्णांसाठी देवापेक्षा कमी नाहीत. जगभरात रुग्णांच्या सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदाते दरवर्षी साजरा करतात.
जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस का साजरा केला जातो? हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश रुग्णांच्या सुरक्षेबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवणं हा आहे. डॉक्टर आणि रुग्णांमधील हस्तक्षेप दूर करण्यासाठी जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस देखील साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी शिबिरं लावून जनजागृती केली जाते. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) प्रायोजित केलेल्या 11 आरोग्य मोहिमांपैकी ही एक आहे. रुग्णांना चुकीची औषधं किंवा उपचार मिळण्यापासून रोखता यावं यासाठीही हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाचा इतिहास : जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस 2019 मध्ये प्रथमच साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी साजरा केला जातो. 2019 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं लोकांमध्ये रुग्णांच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मोहीम सुरू केली होती. या दिवशी रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी अनेक आरोग्य उत्पादनं लाँच केली जातात. वेबिनार आणि सेमिनारद्वारं त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण देखील केली जाते. इतकेच नाही तर या दिवशी रुग्णालयांमधील आरोग्य सेवा आणि रुग्णांची सुरक्षाही सुधारली जाते.
जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाची थीम : जागतिक रुग्ण सुरक्षा दिन 2023 ची थीम लोकांना रूग्णांची काळजी आणि संरक्षण करण्यासाठी प्रेरित करणं आहे. सर्व आरोग्य सेवा प्रदात्यांना या दिवसात सहभागी होण्यास सांगितलं जातं.
औषधांमुळे रुग्णांना होणारी हानी :
- वैद्यकीय सेवेचा लाभ घेत असलेल्या वीसपैकी एक रुग्ण औषधाच्या अपरिहार्य हानीमुळं प्रभावित होण्याची शक्यता असते आणि चारपैकी एका रुग्णाला जीवघेणा आजार होण्याची शक्यता असते.
- औषध-संबंधित हानी हे टाळता येण्याजोग्या हानीचं प्रमुख कारण आहे, जे वैद्यकीय सेवेतील एकूण टाळता येण्याजोग्या हानीपैकी अंदाजे 50% आहे.
- औषध-संबंधित हानीचे दर वृद्ध रुग्णांमध्ये सर्वाधिक आहेत.
- रुग्णांसाठी औषधे लिहून देताना, प्रशासित करताना आणि निरीक्षण करताना औषधोपचार त्रुटी येऊ शकतात.
- कुशल आरोग्य व्यावसायिकांना नियुक्त करून, उपचारात्मक टीममध्ये योग्य समन्वय साधून आणि औषधांच्या दुष्परिणामांबद्दल आणि औषध घेण्याच्या योग्य पद्धतीबद्दल शिक्षित करून औषधांचं नुकसान टाळता येऊ शकते.
हेही वाचा :
- Hindi Diwas २०२३ : 'हिंदी दिवस' का साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
- World Lymphoma Awareness Day 2023 : जागतिक लिम्फोमा जागरूकता दिवस 2023; वेळेवर उपचारानं बरा होऊ शकतो लिम्फोमा
- National Engineers Day 2023 : जाणून घ्या कोण होते एम विश्वेश्वरय्या, का साजरा केला जातो राष्ट्रीय अभियंता दिन?
