Skin Care Tips : पिगमेंटेशनच्या समस्येने ग्रस्त आहात ? तर मग करा 'हे' सोपे घरगुती उपाय

Skin Care Tips : पिगमेंटेशनच्या समस्येने ग्रस्त आहात ? तर मग करा 'हे' सोपे घरगुती उपाय
आपण अनेकदा पाहतो, लोकांच्या अंगावर त्यांच्या नेहमीच्या रंगापेक्षा गडद रंगाचे चट्टे पडलेले दिसतात. यालाच पिगमेंटेशन म्हणतात. ही काही तशी गंभीर समस्या नाही आणि त्याने कसला धोकाही निर्माण होत नाही. चला तर जाणून घेवूया यावरचे काही घरगुती उपाय.
हैदराबाद : सुंदर आणि निर्दोष त्वचा असावी अशी कोणाची इच्छा नसते? पण, धकाधकीची जीवनशैली, तणाव आणि प्रदूषणामुळे लोक त्यांच्या त्वचेची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात. यापैकी एक म्हणजे पिग्मेंटेशन, म्हणजेच चेहऱ्यावरील डाग. जाणून घेवूया पिग्मेंटेशनची कारणे.
त्वचेच्या जळजळीनंतर येणारे पुरळ : तुमच्या त्वचेवर पिंपल्स किंवा पुरळ येऊन गेल्यानंतर, डास चावल्यानंतर किंवा जखम झाल्यानंतर त्वचेवर पिगमेंटेशन दिसून येते. या सगळ्यानंतर त्वचा बरी होते पण त्यावर गडद डाग दिसतात. तुमच्या त्वचेच्या रंगापेक्षा ते गडद असतात. काही काळानंतर ते दिसतही नाहीत. मात्र, तुम्ही सारखे त्यावर खाजवलेत, त्वचेला बरे होण्याचा वेळच दिला नाहीत तर मात्र हे डाग कायम राहू शकतात. वैद्यकीय उपचार घेताना : काही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेतानाही त्वचेवर पिगमेंटेशन दिसू शकते. काही औषधांमुळे त्वचेवर रिअॅक्शन झाल्यामुळे पिगमेंटेशन दिसते.
सूर्यप्रकाशात जास्त वावर : तुम्ही उन्हात जास्त वेळ राहिलात तर पिगमेंटेशन होऊ शकते. तुमचे कपाळ, डोक्यावर, नाकावर आणि अगदी हातावरही हे डाग दिसतात. मेलास्मा : हार्मोनल बदलांमुळे मेलास्मा होतो. गरोदरपणात मुख्यत्वे स्त्रियांमध्ये मेलास्मा पोटावर आणि चेहऱ्यावर येतो. अनेकदा पुरुषांच्या अंगावरही हे दिसते. अनुवांशिक : यामुळे शरीरावर चामखिळ किंवा फ्रिकल्स येऊ शकतात.
घरगुती उपाय : चेहऱ्यावर दिसणारे डाग तुमचे सौंदर्य खराब करतात. चेहर्यावरील रेचकांमुळे सौंदर्य कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करून पिगमेंटेशनची समस्या दूर करू शकता. चला जाणून घेऊया या घरगुती उपायांबद्दल : सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, बटाटा पिगमेंटेशनवर खूप प्रभावीपणे कार्य करतो. कारण त्यात कॅटेकोलेज एंजाइम्स असतात. बटाट्याचा तुकडा घ्या आणि काही आठवड्यांपर्यंत दिवसातून दोनदा तो झिजलेल्या भागावर घासून घ्या. 20 मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर चेहरा धुवा.
पिगमेंटेशन कमी करण्यासाठी : बेसन, हळद आणि दूध देखील पिगमेंटेशन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. यासाठी 2 चमचे बेसन घ्या, त्यात चिमूटभर हळद घाला आणि थोडे दूध घालून पेस्ट बनवा. पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा. कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. ज्यांना पिगमेंटेशनची समस्या आहे, त्यांच्यासाठी कोरफड खूप फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्यावरील काळे डागही दूर होतात. जर खोल पिगमेंटेशनची समस्या असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे कच्चे दूध.
