ETV Bharat / sukhibhava

Clean nonstick cookware : नॉनस्टिक भांडी जळाल्यास स्क्रबनं घासण्याची करू नका चूक; 'अशी' टिकवून ठेवा चमक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 1:14 PM IST

Clean nonstick cookware : नॉन स्टिक भांड्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत स्वयंपाक करताना ती जळल्यास पुन्हा चमकण्यासाठी काही सोप्या टिप्स...

Clean nonsticky cookware
नॉन स्टिक भांडी

हैदराबाद Clean nonstick cookware : नॉन स्टिक भांडी कमी तेलात स्वयंपाक करण्याच्या उद्देशाने तयार केली जातात. अशा परिस्थितीत या भांड्यांवर एक थर लावला जातो, ज्यामुळे भांड्यांना काहीही चिकटत नाही. याशिवाय ही भांडी सामान्य भांड्यांपेक्षा वेगळी असतात. त्यामुळे ही भांडी अतिशय काळजीपूर्वक सांभाळावी लागतात. अन्यथा ती खराब होतात. त्यामुळे स्टील स्क्रबरसारख्या कठीण वस्तूने ती घासून स्वच्छ करण्याची चूक कधीही करू नये. तुमची नॉन स्टिक भांडी जळल्यावर स्क्रबरऐवजी तुम्ही 'या' उपायांची मदत घेऊ शकता.

मिठाच्या पाण्यानं करा स्वच्छ : जळलेली नॉन-स्टिक भांडी स्वच्छ करण्याचा सर्वात स्वस्त आणि प्रभावी मार्ग म्हणजे ती मिठाच्या पाण्यानी धुणे. यासाठी कोमट पाण्यात 4-5 चमचे मीठ मिसळून पेस्ट तयार करा आणि 15-20 मिनिटे जळलेल्या भांड्यावर ठेवा. आता स्पंजने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. जर डाग पूर्णपणे निघाले नाही तर ही प्रक्रिया पुन्हा करा.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरा : जळलेले नॉन-स्टिक भांडे नव्यासारखे चमकण्यासाठी, गरम पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि थोडावेळ उकळाा. नंतर त्यात थोडे व्हिनेगर घाला आणि पेस्ट तयार करा. नंतर जळलेल्या भागावर लावा आणि 5-10 मिनिटे ठेवा. आता ते स्पंजने घासून स्वच्छ करा.

गरम पाण्यात डिशवॉश मिसळून डाग काढून टाका : नॉन-स्टिक भांडे आतून जळत असल्यास ते गॅसच्या शेगडीवर ठेवा, त्यात पाणी आणि डिश वॉश घाला आणि 5 मिनिटे ठेवा. हे भांड्याचा जळलेला थर काढून टाकेल. नंतर गॅसवरून भांडे काढून थंड होऊ द्या आणि आता स्पंजने घासून स्वच्छ करा.

अ‍ॅल्युमिनियम फॉइल : अ‍ॅल्युमिनियम फॉइलच्या मदतीने नॉनस्टिक भांडीही स्वच्छ करता येतात. यासाठी फॉइलचे मध्यम आकाराचे गोळे बनवा. आता भांड्यात डिटर्जंट घाला आणि गोळ्यांच्या मदतीने स्वच्छ करा. त्यामुळे ही भांडी चमकण्यास मदत होते.

हेही वाचा :

  1. Soaked Peanuts Benefits : रोज सकाळी खा भिजवलेले शेंगदाणे; तुमचा मेंदू होईल वेगवान...
  2. Benefits Of Potatoes : बटाटे आहेत आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या फायदे..
  3. Yoga For Acidity : 'ही' योगासनं तुम्हाला देतील अ‍ॅसिडीटी आणि गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.