सावधान..! 'या' 5 सवयी धुम्रपानपेक्षाही अधिक धोकादायक ठरू शकतात

author img

By

Published : Sep 22, 2021, 7:51 PM IST

प्रतिकात्मक

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण करीअरमध्ये पुढे निघून जातो, मात्र आपल्या आरोग्याबाबत केलेली तडजोड म्हातारपणापर्यंत चुकवतो. पण, जर आरोग्याची काळजी सुरुवातीपासूनच केली तर, पुढचे आयुष्य आपण निरोगी राहून जगू शकतो. म्हणूनच आपण निरोगी जीवनशैलीची सवय लावणे महत्वाचे आहे.

आपला असा विश्वास आहे की, आपण निरोगी आणि चांगले आयुष्य जगत आहोत. आधुनिक जीवनशैलीचे अनुसरण करत आपल्याला असे वाटते की, सर्व चांगल्या रितीने सुरू आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का? कदाचित वास्तव वेगळे असू शकते. कारण, आजकाल ज्या प्राकरचे अन्न आणि कार्यशैलीसोबत आपण जगत आहोत त्याने आपल्या शारीरिकच नव्हे तर, मानसिक आरोग्यावरही परिणाम पडतो. काही सवयी देखील शरीराला धोकादायक ठरू शकतात. याबाबत लोकांंना माहिती असणे गरजेचे आहे. 'वन अबाव' (OneAbove) या हेल्थकेअर उपकरण कंपनीच्या सह - संस्थापक नेहा मित्तल यांनी 5 अशा सवयींबाबत माहिती दिली आहे ज्या धुम्रपानपेक्षाही अधिक धोकादायक ठरू शकतात.

1) झोपची कमतरता किंवा तिच्याशी तडजोड

तुम्हाला कधी हे जाणवले का की, आपली रात्रीची झोप पूर्ण न झाल्यास सकाळी आपण खूप अस्वस्थ, चिडलेल्या मूडमध्ये उठतो. चिडचिडपणामुळे काही लोक संपूर्ण घर डोक्यावर उचलून घेतात. आपल्या शरीराला झोपेची आवश्यक्ता फक्त विश्रांतीसाठी नाही तर, अनेक कारणांसाठी असते. जसे, आपण निरोगी आणि भरपूर झोप घेऊन उठल्याने आपले पाचनतंत्र बिघडत नाही, आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते, त्याचबरोबर श्वसनाशी संबंधित आजारही दूर होतात. त्यामुळे, भरपूर झोपेचा आनंद घ्या, कामासाठी वेळ काढता तसे वेळेत जेवण करा आणि आराम करा.

2) उच्च प्रथिनेयुक्त (protein) आहार किंवा मांसाहार

उच्च प्रोटीनयुक्त आहार जो मांसाहारापासून मिळतो, त्याचे अधिक प्रमाणात सेवन आरोग्यासाठी हानिकारक नव्हे तर, धोकादायकही मानले गेले आहे. खूप अधिक प्रमाणात उच्च प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन जसे, चीज, मटन किंवा अन्य मांसाहार कॅन्सरचे कारणही ठरू शकते. उच्च प्रोटीनयुक्त आहार आइजीएफ 1 नावाचे हार्मोन्स तयार करतात, जे कॅन्सरचे कारण ठरू शकते. त्यामुळे, अधिक प्रमाणात शाकाहारी प्रोटीन जसे, राजमा, कुलथ इत्यादींना आपल्या आहारामध्ये समाविष्ट करा.

3) उशिरा पर्यंत काम करणे

जेव्हा तुम्ही उशिरा पर्यंत जागेहून न हालता काम करता, तेव्हा तुम्ही आपल्या शरीराला धुम्रपानपेक्षाही अधिक हानी पोहोचवता. अनेक शोधांच्या आधारावर डॉक्टर या निष्कर्षावर पोहोचले आहे की, उशिरापर्यंत काम केल्याने तुम्ही अनेक आजारांनी ग्रस्त होऊ शकता, जसे लंग, ब्रेस्ट आणि आतड्यांचा कर्करोग. जेव्हा तुम्ही सतत 1 तास बसून राहता तेव्हा कमीत कमी 10 मिनिटांसाठी उठून हल्का वॉक करा, थोडे डेस्कवरच स्ट्रेचिंग करा आणि प्रत्येक आर्ध्या तासात पाणी प्या.

4) एकाकीपणा

आपण रोजच्या जीवनात इतके व्यस्त होतो की, अनेकदा आपण एकटे होऊन जातो, हे आपल्याला माहिती देखील होत नाही. तुम्ही असा विचार करत असाल की, आजुबाजूला भरपूर लोक असतानाही तुम्हाला एकाकीपणा का जाणवतो? याची अनेक कारणे असू शकतात, जसे तुम्ही कोण्या मानसिक समस्येने ग्रस्त आहात किंवा कुणाशी बोलण्याची तुमची इच्छा नाही. मनुष्य एकटा राहू शकत नाही, या करणानेच त्याला सामाजिक प्राणी असे म्हणतात. एकाकीपणा अनेक आजारांना जन्म देऊ शकते, मुख्य म्हणजे हृदयविकार. या व्यतिरिक्त भावनिक समस्या, नैराश्य, चिंता आणि व्यसनही होऊ शकते. त्यामुळे, कमीत कमी एक चांगला मित्र बनवा किंवा एक पाळीव प्राणी ठेवा जो तुमचे एकाकीपण कमी करून तुम्हाला निरोगी ठेवेल.

5) सूर्यप्रकाशाचा अभाव

आजकाल लोक बाहेर जाऊन सूर्य प्रकाशात खूप कमी वेळ काढतात. याचे कारण अनेक होऊ शकतात, जसे वेळेचा अभाव, खूप काम किंवा आळस. मात्र, सूर्य प्रकाशापासून जे विटामिन - डी आपल्याला मिळते ते हाडांच्या आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी देखील खूप आवश्यक असते. आजकाल लोक टॅनिंगसाठी देखील टॅनिंग पार्लरला जात आहेत, जी चुकीची पद्धत आहे. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा - आताच सावध व्हा.. सेक्स अ‍ॅडिक्शनमुळे होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.