चांगल्या पॅरेंटिंगसाठी 'या' टिप्स ठरू शकतात फायदेशीर

author img

By

Published : Sep 18, 2021, 9:12 PM IST

प्रतिकात्मक

मुलाचे वर्तन आणि त्याच्या व्यक्तिमत्वासाठी सामान्य: लोक त्याच्या संगोपनाला जबाबदार मानतात. अनेकदा पालक मुलांना बोलून चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात, मात्र तुम्हाला माहिती आहे का? मुले शिकवून नव्हे तर, आपल्या आई-वडिलाचे वर्तन आणि आजुबाजूच्या परिस्थितीपासून चांगल्या आणि वाईट गोष्टी शिकतात आणि आत्मसात करतात.

मुलाचे वर्तन आणि त्याच्या व्यक्तिमत्वासाठी सामान्य: लोक त्याच्या संगोपनाला जबाबदार मानतात. अनेकदा पालक मुलांना बोलून चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात, मात्र तुम्हाला माहिती आहे का? मुले शिकवून नव्हे तर, आपल्या आई-वडिलाचे वर्तन आणि आजुबाजूच्या परिस्थितीपासून चांगल्या आणि वाईट गोष्टी शिकतात आणि आत्मसात करतात.

पूर्वीच्या काळी लोक बहुतांश संयुक्त कुटुंबात राहात होते, जेथे घरात केवळ आई - वडीलच नव्हे तर, आजी - आजोबा, काका - काकू आणि बरेच भाऊ - बहिणीही असायचे. अशात मुलांच्या संगोपणाची जबाबदारी, त्यांना चांगल्या बाबी आणि योग्य वर्तन शिकवण्याची जबाबदारी केवळ त्यांच्या आई - वडिलांचीच नव्हे तर, घरातील सर्व सदस्य या कामात भाग घ्यायचे. मात्र, आजच्या काळात बहुतेक लोक न्युकलिअर कुटुंबात राहतात, अशात योग्य पॅरेंटिंग कशी असते, याबाबत बहुतांश पालकांच्या, विशेषत: नवीन पालकांच्या मनात प्रश्न असतात.

वरिष्ठ मनोचिकित्सक डॉ. वीणा कृष्णन सांगतात की, मुले आई - वडिलांना बोलून जे शिकवायचे आहे ते शिकले नसले तरी, बहुतांश गोष्टी ते आपल्या आई - वडिलांना पाहून शिकतात. त्यामुळे, पालकांचे परस्पर वर्तन सकारात्मक, आदरणीय आणि आनंददायी असावे, तरच मुले आनंदी बालपण जगू शकतील.

चांगली पॅरेंटिंग कशी असावी, याबाबत वेगवेगळे तज्ज्ञ वेगवेगळे टिप्स देतात, ज्यातील काही पुढील प्रमाणे आहेत,

1) तज्ज्ञांच्या मते, पालकांनी नेहमी घरातील वातावरण आदरणीय, आनंददायी आणि सकारात्मक बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. चांगल्या निरोगी वातावरणात मुलांमध्ये आनंद, सम्मान, संतुष्टी आणि सुरक्षेची भावना निर्माण होते.

2) मुलांबरोबर नियमित दर्जेदार वेळ घालवला पाहिजे, त्यांच्यासोबत बोलले पाहिजे. विशेषत: त्यांचे बोलने ऐकले पाहिजे. असे केल्याने पालक आणि त्यांच्या मुलांमधील संबंध आणि प्रेम अधिक बळकट होते.

3) तुमच्या मुलाची चांगली वृत्ती किंवा सकारात्मक वर्तनावर अधिक लक्ष दिले पाहिजे. पालक जितके अधिक आपल्या मुलाला त्याच्या वाईट वर्तनासाठी रागवणार, तेवढेच तो त्याकडे आकर्षित होईल. याला पॅरेंटिंगच्या भाषेत नकारात्मक वृत्ती किंवा निगेटिव्ह अ‍ॅपरोच म्हणतात. रागवण्याऐवजी मुलाला चांगले आणि वाईट यातील फरक सांगा. मात्र, बाब अधिक गंभीर असेल तर रागवणे देखील म्हत्वाचे आहे, पण रागवताना अपशब्द किंवा अपमानजन शब्दांचा वापर होऊ नये.

4) मुलांना वस्तू वाटण्याची सवय शिकवणे खूप महत्वाचे आहे, शाळेत टिफिन, पेन्सिल - पेन, आवश्यकता पडल्यास कुठले पुस्तक, जर मुलगा ही सवय शिकला तर याचा त्याच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होतो.

5) समान्यत: असे दिसून येते की, पालक कामाचे तनाव आणि समस्या असल्यास आपल्या वर्तनावरील नियंत्रण गमवू लागतात परिणामी, नकळत आपला राग मुलांवर ओरडून काढतात. असे केल्याने मुलांच्या कोमळ मनावर परिणाम होतो आणि त्यांच्या वर्तनात क्रोध आणि जिद्द वाढते. तेच आई - वडील आणि मुलांमधील नात्यामध्ये देखील दुरावा आणि सन्मानात कमतरता येऊ लागते. शक्य तितके पालकांनी मुलांवर ओरडून नये. जर तुम्हाला त्यांना काही समजून सांगायचे असेल तर त्याआधी तुम्ही मुलाचा दृष्टिकोण आणि त्याच्या भावना समजून घ्या.

6) तुमच्या मुलाने मोठे होऊन त्याच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या, अशी तुमची इच्छा असेल तर, त्याची सुरुवात तुम्हाला आतापासून करावी लागेल. घरातील छोट्या कामांत त्यांची मदत घ्या. याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि ते आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर बनतील.

7) जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा मुलगा काही शिकला पाहिजे तर त्याला त्याचे काम स्वत: करू द्या. सुरुवातीला तो काम व्यवस्थितरित्या करणार नाही, याची शक्यता असू शकते, मात्र त्याला स्वत: शिकू द्या.

8) तुमच्या मुलाला आव्हानांचा सामाना सकारात्मक मार्गाने करण्यास शिकवा. तज्ज्ञांच्या असा विश्वास आहे की जी लोक आव्हानांना सकारात्मकतेने बघतात त्यांना यश नक्कीच मिळते. तेच जी लोक आव्हानांना नकारात्मक दृष्टिकोणाने बघतात, ते आधीच यापासून परभव स्वीकारतात आणि त्यास स्वीकार देखील करत नाही.

9) मुलाला कठोर नियंत्रणाखाली ठेवण्याऐवजी त्यांचा मित्र किंवा मार्गदर्शक बनण्याचा प्रयत्न करा. आवश्यक्तेपेक्षा अधिक नियंत्रण मुलाच्या विकसाला अडथळा ठरू शकतात. मुलाच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सल्ला द्यायची गरज नाही. विशेषकरून तेव्हा जेव्हा तुमची मुले टीनएज किंवा त्यापेक्षा अधिक वयाची असेल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, मुलाला आपल्यासारखे नव्हे तर, त्याला त्याच्यासारखे होऊ द्या, म्हणजेच त्याच्या व्यक्तिमत्वाला स्वीकारा.

हेही वाचा - सोशल मीडियातील 'लाइक' आणि 'शेअर'वर संशोधन, निष्कर्ष चकीत करणारे, वाचा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.