महिलेच्या नावाने तरुणाने उघडले फेसबूक खाते, हनीट्रॅपमध्ये दिल्लीच्या डॉक्टरला घातला होता कोटींचा गंडा

author img

By

Published : Sep 5, 2021, 9:26 AM IST

हनीट्रॅपमध्ये दिल्लीच्या डॉक्टरला घातला कोटीचा गंडा

डॉ. रजत यांची यवतमाळातील बनावट खाते असलेल्या एका तरुणीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. ही ओळख काही काळात मैत्रीमध्ये बदलली. दरम्यान डॉ. गोयल सोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्या बनावट खाते असलेल्या तरुणीने त्यांच्याकडून दोन कोटी रोख, मौल्यवान दागीने फसवणूक करून मिळवले.

यवतमाळ - सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून चक्क दोन कोटी रुपयांनी दिल्लीतील डॉक्टरची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अवघ्या २४ तासांच्या आत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्या तरुणाकडून एक कोटी ७६ लाख ६ हजार १९८ रूपयांची रोख हस्तगत करण्यात आली. संदेश मानकर (रा. अरूणोदय सोसायटी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. रजत गोयल (रा. दिल्ली) असे फसवणूक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

हनीट्रॅपमध्ये दिल्लीच्या डॉक्टरला घातला कोटीचा गंडा
हनीट्रॅपमध्ये दिल्लीच्या डॉक्टरला घातला कोटीचा गंडा
तरुणी म्हणून केली सोशलमीडियावर ओळख-डॉ. रजत यांची यवतमाळातील बनावट खाते असलेल्या एका तरुणीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. ही ओळख काही काळात मैत्रीमध्ये बदलली. दरम्यान डॉ. गोयल सोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्या बनावट खाते असलेल्या तरुणीने त्यांच्याकडून दोन कोटी रोख, मौल्यवान दागीने फसवणूक करून मिळवले. दरम्यान स्वत:चे अकाऊंट अचानक बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे डॉ. गोयल यांच्या लक्षात आले. त्यानंतर डॉ. गोयल यांनी थेट यवतमाळ गाठत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची भेट घेत घडलेला प्रकार त्यांना सांगितला.
हनीट्रॅपमध्ये दिल्लीच्या डॉक्टरला घातला होता कोटींचा गंडा
पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. भुजबळ यांनी चौकशी करून अज्ञातावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर यवतमाळ सायबर सेलने याबाबत चौकशी सुरू केली असता, डॉ. गोयल यांची फसवणूक करणारी तरुणी नसून तरुण संदेश मानकर असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. या माहितीवरून पोलिसांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून अरुणोदय सोयायटीतील मानकर याच्या घरी धाड टाकली. यावेळी त्याला ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी सुरू केली असता, त्यानेच हा प्रकार केल्याचे समोर आले.पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगतया प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाकडून एक कोटी ७२ लाख ७०० रूपये रोख, चार लाखाचे सोन्याचे दागीने, चार विविध कंपनीचे मोबाईल असा एकूण एक कोटी ७६ लाख ६ हजार १९८ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, सायबर सेलचे सहायक पोलीस निरिक्षक अमोल पुरी, गजानन करेवाड, विवेक देशमुख, पथकातील गजानन डोंगरे, विशाल भगत, उल्हास कुरकुटे, महमद भगतवाले, सलमान शेख, किशोर झेंडेकर, पंकज गिरी, रोशनी जागळेकर, प्रगती यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.