Yavatmal Flood वणी तालुक्यात एक वृद्ध महिलेसह 8 लोकांची पुराच्या पाण्यातून सुटका

author img

By

Published : Sep 14, 2022, 8:16 PM IST

Yavatmal Flood

Yavatmal Flood जिल्ह्यात मागील 48 तासापासून पावसाची उघडीप सुरू आहे. 13 सप्टेंबरला दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळी पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे धरण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढली आहे. Yavatmal Flood तर उर्ध्व व निम्न वर्धा प्रकल्पातून पाण्याच्या विसर्ग केल्यामुळे वणी तालुक्यातील सहा गावांना पुराचा वेढा घेतला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात मागील 48 तासापासून पावसाची उघडीप सुरू आहे. 13 सप्टेंबरला दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळी पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे धरण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढली आहे. Yavatmal Flood तर उर्ध्व व निम्न वर्धा प्रकल्पातून पाण्याच्या विसर्ग केल्यामुळे वणी तालुक्यातील सहा गावांना पुराचा वेढा घेतला आहे. यावेळी बचाव शोध पथकाने पुरातुन एका आजारी वृद्ध महिलेसह आठ जणांना रेस्क्यू केले आहे.

पुराच्या पाण्यातून सुटका

रेस्क्यू करण्यात आलेल्या नागरिकांची नावे मिराबाई सिताराम हेपट, पूजा राकेश उराडे, वृषभ राकेश उराडे, शालू हरिश्चंद्र गोबाडे, रमेश गजानन काकडे, गजानन नामदेव काकडे, अमोल गंगाधर मते, निरूपा अमोल मत्ते अशी रेस्क्यू करण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहे. जिल्ह्यात मागील दोन त तीन दिवसापासून कुठे संततधार तर कुठे मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यात काही भागात विजेचा कडकडासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार सांयकाळी पावसाने पुन्हा यवतमाळ शहराला झोडपले. तर उर्ध्व व निम्न वर्धा प्रकल्पातून पाण्याच्या विसर्ग केल्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांना अलर्ट जारी Alert to five taluks district केला होता. अशातच रात्रीतून वर्धा नदिचे पाणी वाढल्याने वणी तालुक्याला पुन्हा एकादा पुराचा तडाखा बसला आहे.

पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका यामध्ये वणी तालुक्यातील मूर्ती, सावंगी, चिंचोली, कवडशीसह अन्य दोन अश्या एकूण 6 गावाला पुराच्या पाण्याने वेढले आहे. पुरामुळे त्या गावाचा संपर्क तुटला आहे. तर बोरी ते मूर्ती, सावंगी, चिंचोली, कवडशी व वरोरा हे मार्ग बंद झाले आहेत. कवडशी येथील 90 वर्षीय महिला गंभीर आजारी असल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनासोबत संपर्क साधला. व रेस्क्यू करण्याचे आर्जव केले आहे. प्रशासनाने तातडीने यवतमाळ येथील रेस्क्यू (rescue) टीमला पाचारण केले. त्यानंतर बचाव शोध पथकाने ऑपरेशन राबवून संबंधित आठ जणांची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.