यवतमाळ जिल्ह्यात 72 ग्रामपंचायतीचा निकाल घोषित, काँग्रेसची सरशी, शिंदे गटाला एकही जागा नाही

author img

By

Published : Sep 19, 2022, 9:46 PM IST

काँग्रेसची सरशी

यवतमाळ जिल्ह्यात 70 पैकी 33 ग्रामपंचायतीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे (Yavatmal gram panchayat elections). स्थानिक लोकप्रतिनिधीनी आपापल्या भागातील ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. निकालानंतर विजयी उमेदवार तसेच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवाय, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणुक होती.

यवतमाळ - जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. ग्रामपंचयात निवडणुकीत काँग्रेसने भरारी घेतली आहे (congress gain). 70 पैकी 33 ग्रामपंचायती काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीनी आपापल्या भागातील ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. निकालानंतर विजयी उमेदवार तसेच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला (Yavatmal gram panchayat elections).

अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला - जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. 72 ग्रामपंचायतीपैकी पांढकरवडा तालुक्यातील आसोली तसेच राळेगाव तालुक्यातील भिमसेनपुर या दोन ग्रामपंचायती आधीच विनविरोध झाल्या. उर्वरीत 70 ग्रामपंचायतीसाठी रविवार (ता.18) मतदान झाले. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवाय, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणुक होती.

लिटमस्ट टेस्ट - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची लिटमस्ट टेस्ट म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिल्या जात होते. निवडणुकीत काँग्रेसने चांगले कमबॅक केले आहे. 33 ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली आहे. भाजप दुसर्‍या क्रंमाकावर आहे. त्यांचे 20 ठिकाणी सरपंच विजयी झाले आहेत. तिसर्‍या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली आहे.

शिंदे गटाला एकही जागा नाही - शिवसेनेला तीन, मनसे एक तर स्थानिक आघाडीनी सहा ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली आहे. यानिवडणुकीत स्थानिक लोकप्रतिनिधींना यश मिळाले आहे. सरपंचांची निवडणूक जनतेतून करण्यात आली होती. जिल्ह्यात शिंदे-फडणवीस सरकारला या निर्णयानंतर फार काही हाती लागले नाही. शिंदे गटाला एकही जागा मिळालेली नाही. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाचे कार्येकर्त, पदाधिकारी तसेच विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.