महाविकास आघाडी सत्तेची पाच वर्षे पूर्ण करेल, माजीमंत्री संजय राठोड यांना विश्वास

author img

By

Published : Sep 11, 2021, 6:48 AM IST

माजीमंत्री संजय राठोड

विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर विविध प्रकारचे आरोप केले जातात. सत्ताधारी आणि विरोधकांचे ते कामच आहे. परंतु, आरोप करताना तारतम्य ठेवले पाहिजे. एका प्रकरणातून मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली. त्याचप्रमाणे आमचाही न्यायालय, लोकशाहीवर विश्वास आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असे सूचक प्रतिक्रिया माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी दिली.

यवतमाळ - माजी मंत्री संजय राठोड यांच्या घरी गणरायाचे आगमन मोठ्या थाटात झाले. गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर राठोड यांनी देशासह जगभरातील कोरोनाचे संकट दूर व्हावे, राज्यातील बळीराजाला सुख समृद्धीचे दिवस यावेत असे साकडे घातले. गणेशाच्या आगमनाला संजय राठोड याचे आई भाऊ, पत्नी मुले मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यावेळी सपत्नीक पूजाअर्चा झाल्यानंतर राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वास व्यक्त केला.

विरोधकांकडून विविध आरोप

विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर विविध प्रकारचे आरोप केले जातात. सत्ताधारी आणि विरोधकांचे ते कामच आहे. परंतु, आरोप करताना तारतम्य ठेवले पाहिजे. एका प्रकरणातून मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली. त्याचप्रमाणे आमचाही न्यायालय, लोकशाहीवर विश्वास आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असे सूचक प्रतिक्रिया माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी दिली.

सरकार पाच वर्षे टिकेल

महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून विरोधकांकडून हे सरकार दोन महिन्यात पडेल. सहा महिन्यात पडेल, दोन वर्षात पडेल असे सांगत आहेत. मात्र महाविकास आघाडीचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू असून कोरोना काळातही नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. नागरिकांच्या हिताचे निर्णय हे सरकार घेत असल्याने पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी बोलताना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.