तरुणीच्या नावाने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'हनीट्रॅप',  दिल्लीच्या डॉक्टरला दोन कोटींचा गंडा

author img

By

Published : Sep 5, 2021, 3:13 PM IST

Updated : Sep 5, 2021, 3:34 PM IST

Honeytrap through social media

सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून चक्क दोन कोटी रूपयांना दिल्लीतील डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला अवघ्या २४ तासाच्या आत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या तरुणाकडून एक कोटी ७६ लाख ६ हजार १९८ रूपयांची रोख हस्तगत करण्यात आली.

यवतमाळ - सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून चक्क दोन कोटी रूपयांना दिल्लीतील डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला अवघ्या २४ तासाच्या आत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या तरुणाकडून एक कोटी ७६ लाख ६ हजार १९८ रूपयांची रोख हस्तगत करण्यात आली. संदेश मानकर (रा. अरूणोदय सोसायटी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी दिली. रजत गोयल (रा. दिल्ली) असे फसवणूक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी
तरुणी म्हणून केली सोशल मीडियावर ओळख -
डॉ. रजत यांची यवतमाळ मधील एका तरुणीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. ही ओळख काही काळात मैत्रीमध्ये बदलली. दरम्यान डॉ. गोयल सोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्यांच्याकडून दोन कोटी रोकड, मौल्यवान दागिने फसवणूक करून स्विकारले. दरम्यान स्वत:चे अकाऊंट अचानक बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे डॉ. गोयल यांच्या लक्षात आले. त्यानंतर डॉ. गोयल यांनी थेट यवतमाळ गाठत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची भेट घेत घडलेला प्रकार त्यांना सांगितला.

Honeytrap through social media
पोलिसाकडून तरुणाला अटक

हे ही वाचा - tokyo paralympics : कृष्णा नागरचा सुवर्णभेद; तर सुहास यथिराजने पटकावलं रौप्य

पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे -

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी चौकशी करून अज्ञातावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर यवतमाळ सायबर सेलने याबाबत चौकशी सुरू केली असता, डॉ. गोयल यांची फसवणूक करणारी तरूणी नसून तरूण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. या माहितीवरून पोलिसांनी एक पथक तयार करून अरूणोदय सोयायटीतील एका संशयित तरुणाच्या घरी धाड टाकली. यावेळी संदेश मानकर या तरूणाला ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी सुरू केली असता, त्यानेच हा प्रकार केल्याचे समोर आले.

हे ही वाचा - राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा पोलिसांनी घेतला धसका, नृसिंहवाडीत पोलिसांचा फौजफाटा तैनात

पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्धेमाल हस्तगत -

या प्रकरणी पोलिसांनी त्या तरूणाकडून एक कोटी ७२ लाख ७०० रूपये रोख, चार लाखाचे सोन्याचे दागिने, चार विविध कंपनीचे मोबाईल असा एकूण एक कोटी ७६ लाख ६ हजार १९८ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, गजानन करेवाड, विवेक देशमुख, पथकातील गजानन डोंगरे, विशाल भगत, उल्हास कुरकुटे, महमद भगतवाले, सलमान शेख, किशोर झेंडेकर, पंकज गिरी, रोशनी जागळेकर, प्रगती यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Last Updated :Sep 5, 2021, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.