Yavatmal Municipal Council: नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची बदली करू नये म्हणून जमिनीत गाडून केलं आंदोलन

author img

By

Published : Sep 20, 2022, 3:27 PM IST

Updated : Sep 20, 2022, 4:07 PM IST

नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची बदली करू नये या मागणीसाठी नागरिकांचे आंदोलन

यवतमाळ येथे नगरपरिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची बदली होऊ नये यासाठी समर्थकांनी नगरपालिकेसमोरच स्वत:ला खड्ड्यात गाडून घेत समाधी आंदोलन केले आहे. (Yavatmal Municipal Council) राजकीय षडयंत्रातून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून माधुरी मडावी यांची बदली करण्याचे कारस्थान सुरू आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे. दरम्यान, अशोक डेरे व हेमंत कांबळे या दोघांनी चक्क स्वतःला पालिकेसमोरच जमिनीत गाडून आंदोलन केले आहे. तसेच, अनेक समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

यवतमाळ - नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवार, (दी. 19 सप्टेंबर) रोजी यवतमाळकर जनतेने जनआक्रोश मोर्चा काढला. (Municipal Council Chief Officer transferred) स्थानिक संविधान चौक काढण्यात आलेला हा मोर्चा शहरात विविध मार्गाने मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची बदली करू नये म्हणून जमिनीत गाडून केलं आंदोलन

कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बदली - यवतमाळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पदभार स्वीकारून जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. एवढ्या कमी कालावधीत त्यांनी नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी अनेक चांगले उपक्रम सुरू केले, त्याच वेळी रस्ते व चौकांचे सुशोभीकरण केले. नगर परिषदेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असताना त्यांनी नपच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावून त्यांच्यामार्फत स्वच्छता मोहीम राबवून शहर स्वच्छ केले. मात्र, काही लोकप्रतिनिधींनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यामुळे त्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बदली प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळवासीयांनी जनआक्रोश मोर्चा काढून जिल्हादंडाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

उपस्थिती - मुख्याधिकार्‍यांचा सेवा कालावधी देऊन त्यांची प्रस्तावित बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कृष्णा कुसनाके, संगिता पारधी, सुनंदा कऱ्हांडे, मंद गुल्हाने, शितल कोटनाके, रेखा टेकम, वैशाली मसराम, दुर्गा कंगाले, उषा तोडसाम, राजू चांदेकर, सुरवणा वरखडे, विपीन चौधरी, संगीता पवार, धर्मराज चांदेकर, अरुण मदावी, मनमोहन पाटील आदी उपस्थित होते, नरेंद्र किन्नाके, किशोर उईके, श्रद्धा डोगरे, विजय रोहणकर, मंगला कुलसगेन, रंजना परचाके, लता नवरे, सुनीता कुमरे आदी उपस्थित होते.

दोघांनी स्वत: खड्ड्यात पुरून केले आंदोलन - मुख्याधिकाऱ्यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करण्यात आले आहे. दरम्यान, आज उपोषणकर्ते अशोक उर्फ ​​गोलू डेरे आणि हेमंत कांबळे यांनी खड्ड्यात स्वत:ला खड्यात पुरून समाधी घेतली. यावेळी मुख्यधिकारी यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. दरम्यान, जनतेचे आपल्याप्रेम पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी बहुजन जिल्हाध्यक्ष पाटील गुणवंत गणवीर, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेंद्र कांबळे, शंकर धनकुलवार, महिंद्रा ढेपे, गौतम डोंगरे आदी उपस्थित होते.

Last Updated :Sep 20, 2022, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.