Automatic Sonic Car : एम टेक झालेल्या विद्यार्थ्याने बनवली स्वयंचलित ‘सोनिक कार’; 150 रुपयात 250 किलो मीटरचा प्रवास

author img

By

Published : Sep 24, 2022, 5:44 PM IST

Sonic Car

यवतमाळ जिल्ह्यात एम टेक झालेल्या विद्यार्थ्याने स्वयंचलित ‘सोनिक कार’ बनवली ( M Tech student made hydrogen car ) आहे. या कारचा फायदा असा आहे, की १५० रुपयात २५० किलो मिटरचा प्रवास यातून करता येणार आहे.

यवतमाळ - यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्येसाठी ओळखला जातो. मात्र त्याच शेतकऱ्याच्या मुलाने कार बनवली ( farmer son made car ) आहे. याच जिल्ह्यातील शेतकरी पुत्राने भन्नाट कल्पनेतून स्वयंचलित हायड्रोलिक कार बनवली ( M Tech student made hydrogen car ) आहे. केवळ १५० रुपयात २५० किलो मिटरचा प्रवास त्यामुळे करता येणार आहे.

सोनिक कार



मित्राच्या मदतीने कार बनवली - सध्याच्या काळात वाहन वापरणा-यांची संख्या वाढली आहे. दररोज हजारो वाहने रस्त्यावरून धावत आहेत. तसेच पेट्रोल आणि डिजेलचे दर १२० रुपयावर पोहचले आहेत. यावर उपाय म्हणून वणी येथील हर्षल नक्षणे या युवकाने आपल्या कुणाल आसुटकर नावाच्या मित्राच्या मदतीने अफलातून अशी प्रदुषण मुक्त स्वयंचित ‘सोनिक कार’ तयार केली आहे. हर्षलने एम टेकपर्यंत शिक्षण घेतले आहे. या युवकाचे एक स्वप्न होते की, भारताकडे स्वत:ची सक्षम कार असली पाहिजे. परवडणाऱ्या किमतीत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा वापरणे आणि अपघात आणि मानवी चुका कमी होईल अशी कार आहे. त्या दृष्टीकोणातून हर्षल नक्षणे याने एक कंपनी रजिस्टर केली आहे. कुणाल आसुटकर या विज्ञान शाखेत भाग तीन ला शिक्षण घेत असलेल्या बालपणीच्या मित्राच्या मदतीने कार बनविण्याचे काम सुरु केले. गेल्या काही दिवसापूर्वीच ही कार तयार झाली आहे. हायट्रोजन गॅसवर चालविणारी ही कार आहे. सेल्फ ड्रायव्हींगसाठी संगणक तयार केले आहे .

एक लिटर हायट्रोजन - एक लिटर हायट्रोजन मध्ये २५० किलो मिटर धावणार ( car complete 250 km distance in liter hydrogen ) आहे. त्यामुळे पेट्रोल व डिजेलवर चालणा-या वाहनापासून सुटका होणार आहे. फक्त कारसाठी लागणारे काच व टायर ह्या वस्तू अहमदाबाद येथून खरेदी करण्यात आले. प्रायोगिक तत्वावर ही कार तयार कली असून, त्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च आला आहे. इंटरनेट सेवा पुरविण्याच्या व्यवसायातून मिळविलेल्या पैशातून ही कार बनविल्याची माहिती हर्षल नक्षणे यांनी दिली. सेल्फ ड्रायव्हींग व हायट्रोजन फ्युल सिंसटमचे पॅटेट नोंदणी केली आहे. १०० कार तयार झाल्यानंतर ही कार विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.