MP Bhavana Gawali : वाशिमध्ये ED कडून पाच तास तपास, आजची कारवाई संपली

author img

By

Published : Sep 3, 2021, 10:16 PM IST

Updated : Sep 3, 2021, 10:30 PM IST

ed

भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानची चौकशी करण्यासाठी वाशिम येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात ईडीचे तीन जणांचे पथक दाखल झाले होते.

वाशिम - भाजप नेते किरीट सौमैया यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानची चौकशी करण्यासाठी वाशिम येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात ईडीचे तीन जणांचे पथक दाखल झाले होते. या पथकांनी 5 तास चौकशी केली असून, हे पथक रवाना झाले आहे.

वाशिमध्ये ED कडून पाच तास तपास
  • पाच तास झाला तपास -

पाच तासांची आजची चौकशी संपली असून, या चौकशीमध्ये काय समोर येणार याबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही. या अगोदर 30 ऑगष्ट रोजी देगांव स्थित संस्था व रिसोड येथील रिसोड अर्बन क्रेडिट सोसायटीवर ईडीने धाड टाकली होती.

ईडीचे पथक सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल होताच, येथे आपल्या कामनिमित्ताने आलेल्या अनेकांना तसेच माघारी परतावे लागले आहे.

  • ईडीच्या पथकात 3 सदस्य -

आज वाशिमच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयावर ईडीच्या पथकाने झाडाझडती घेतली आहे. या पथकात 3 सदस्य होते. 5 तास या तीन सदस्य पथकाने चौकशी केली आहे. दरम्यान, आज दुसऱ्यांना ईडीचे पथक तपासासाठी वाशिम जिल्ह्यात आले होते.

हेही वाचा - Shiv Seva MP Bhavana Gawali : तपासासाठी ED ची टीम वाशिममध्ये दाखल

Last Updated :Sep 3, 2021, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.