MLA Dadarao Keche : आमदार केचे अधिकाऱ्यांवर संतापले; म्हणाले,...'अन्यथा स्वत: जोड्याने मारेल'

author img

By

Published : Jul 26, 2022, 8:30 PM IST

Updated : Jul 26, 2022, 8:39 PM IST

MLA dadarao keche

सिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंता शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी आर्थिक लाभाची अपेक्षा करत असल्याच्या गऱ्हाणे शेतकऱ्यांनी आमदारांपुढे ( BJP MLA Dadarao keche ) मांडले. यावेळी आमदारांनी थेट अधिकाऱ्यांना सुनावत शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर उभा गाडीन आणि स्वत: जोडे मारेल, असा दम दिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वर्धा - सततच्या पावसाने जोरदार कहर केला आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. पीक गेले जमीन खरडून गेली, विहरी खचल्या या परिस्थिची पाहणी भाजपाचे आमदार दादाराव केचे ( BJP MLA Dadarao keche ) यांनी केली. यावेळी अनेकांनी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंता शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी आर्थिक लाभाची अपेक्षा करत असल्याच्या गऱ्हाणे शेतकऱ्यांनी आमदारांपुढे मांडले. यावेळी आमदारांनी थेट अधिकाऱ्यांना सुनावत शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर उभा गाडीन आणि स्वत: जोडे मारेल, असा दम दिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार केचे कारंजा तालुक्याच्या दौऱ्यावर होते.

आमदार केचेंचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ


आमदार केचेंनी कारंजा तालुक्यातील पारडी शिवारात शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुनीता गाखरे यांच्यासह कृषी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान काही शेतकऱ्यांनी सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता हे शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीच्या नुकसानीबाबत अहवाल बनविताना भेदभाव करत असल्याचा आरोप केला. तुम्ही शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीच्या नुकसान भरपाई देण्यासाठी वीस हजार द्या, दहा हजार द्या, असे म्हणता यावर खडे बोल सुनावले. ज्यांचे पैशे पोहोचले त्यांच्या विहिरी बरोबर दाखविल्या जातात. यामुळे आता असे चालणार नाही, असे आमदार केचे म्हणाले.

हेही वाचा - Ex MLA Rajesh Kshirsagar : झाडाच्या पानाला तुम्हींच किड लावलीतर ते पाने गळूनच पडतील'; राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त खदखद

Last Updated :Jul 26, 2022, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.