Two Students Die : आर्वी येथे दोन शाळकरी मुलांचा पोहताना दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

author img

By

Published : Jun 5, 2022, 5:59 PM IST

School Children Die While Swimming in This Well

वर्ध्याचे आर्वी येथील (At Arvi of Wardha) तपस्या इंग्लिश शाळेत शिकणाऱ्या दोन शाळकरी मुलांचा विहिरीत पोहताना, बुडून मृत्यू (Tragic Death of Two School Children) झाल्याचा धक्कादायक प्रकार आज माठोडा बेनोडा शिवारातील विहिरीत समोर (In the well of Mathoda Benoda Shivara) आला. साईनगर येथील 14 वर्षीय देवांश घोडमारे (Devansh Ghodmare) आणि 15 वर्षीय युगंधर मानकर (Yugandhar Mankar) असे दोन्ही मित्रांचे नाव आहे. दोघांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे.

वर्धा : वर्ध्याचे आर्वी येथील दोन शाळकरी मुलं घरी खेळायला जातो म्हणून सांगून गेले. पण, खेळायला न जाता ते विहिरीत पोहायला गेले आणि यातच त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज माठोडा बेनोडा शिवारातील विहिरीत समोर आला. शेतातील मजुराला विहिरीत मृतदेह दिसताच एकाच खळबळ उडाली. दोघांची ओळख पटली तेव्हा कुटुंबीयांवर मात्र शोककळा पसरली. साईनगर येथील 14 वर्षीय देवांश घोडमारे आणि 15 वर्षीय युगंधर मानकर असे दोन्ही मित्रांचे नाव आहे. दोघेही एकाच शाळेत शिकत होते.

Yugandhar Mankar
युगंधर मानकर


दोघे मित्र गुपचूप जात होते पोहायला : देवांश नीलेश घोडमारे आणि युगंधर मानकर, हे दोघेही आर्वी येथील तपस्या इंग्लिश शाळेत नवव्या वर्गात शिकणारे असून, दोघांची चांगली मैत्री होती. देवांश घोडमारे हा शनिवारी पाच वाजतादरम्यान आपल्या आईला क्रीडासंकुल मैदानात खेळायला जातो असं सांगून गेला. पण, रात्रीचे आठ वाजूनही तो घरी परतला नाही. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली, तेव्हा देवांशचा मित्र युगंधर मानकर हासुद्धा घरी परत आला नसल्याचे समोर आले. दोन्ही मित्र सोबतच गेले असावे, असा कयास लावला जात होता. त्यामुळे दोघांच्याही कुटुंबीयांच्या तक्रारीवरून शोध सुरू झाला.

Devansh Ghodmare
देवांश घोडमारे

मृतदेह काढले विहिरीबाहेर : यातच रविवारी सकाळी माटोडा बेनोडा शिवारातील राजेश गुल्हाने यांच्या शेतातील मजूर हा विहिरीकडे गेला असताना मृतदेह तरंगताना दिसला. यावेळी याची माहिती आर्वी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोहचत असताना एक तरंगताना, तर दुसरा मृतदेह गाळात अडकल्याने शोध घेत मृतदेह काढून आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. दोघांची ओळख पटताच मात्र कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

कुटुंबीयांना खोटे बोलून पोहायला जात होते : मागील काही दिवसांपासून दोघेही याच विहिरीत पोहायला जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोहण्यासाठी ते दोरीच्या साह्याने खाली उतरत पोहत होते. त्यामुळे शनिवारीसुद्धा पोहण्यासाठी पोहचले. पण, यावेळी ते विहिरीतून बाहेर आलेच नाही. यावेळी विहिरीच्या तोंडाजवळ त्यांचे आज कपडे मिळून आले. पण, मुलांच्या पोहण्याचा छंद जीवावर बेतला.

हेही वाचा : तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू; जालना जिल्ह्यातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.